ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आजपासून जिल्ह्यात

0

नंदुरबार । दि.13 । प्रतिनिधी-जिल्ह्यातील धडगाव येथे 132 के.व्ही. सुरवाणी ता.अक्राणी 132 केव्ही, 33/11 केव्ही मोदलपाडा व शहादा शहर उपकेंद्राचे भूमिपुजन होणार आहे.

दि.16 सप्टेंबर रोजी ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते नंदुरबार शहरात सकाळी 10 ते 1 वाजता राजपूत लॉन्स येथे दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतील उपकेंद्राचे ई-भूमिपुजनासह वीजविषयक समस्याबाबत जनतेशी थेट संवाद कार्यक्रम संपन्न होणार आहे.

यावेळी पालकमंत्री ना.जयकुमार रावल, खा.डॉ.हिना गावीत, जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रजनी नाईक, आ.अमरीश पटेल, आ.डॉ.अपुर्व हिरे, आ.डॉ. सुधीर तांबे, आ.चंद्रकांत रघुवंशी, आ.सुरुपसिंग नाईक, आ.डॉ. विजयकुमार गावीत, आ.अ‍ॅड.के.सी.पाडवी, आ.उदेसिंग पाडवी, शहादा नगराध्यक्ष मोतिलाल पाटील, औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, धुळ्याचे जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, जळगांव परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधिक्षक अभियंता अशोक साळुंखे, अधिक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

ना.बावनकुळे हे दि. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता नंदुरबारहून धडगावकडे प्रयाण करतील. सकाळी 10 वाजता नियोजित 132 केव्ही सुरवाणी ता. अक्राणी (धडगांव) उपकेंद्राचे भूमिपुजन, धडगांवहून प्रयाण दुपारी 1 वाजता मोदलपाडा येथील 33/11 केव्ही उपकेंद्राचे भूमिपुजन, त्यानंतर दुपारी 2 वाजता मोदलपाडाहून शहादा प्रयाण, दुपारी 2.45 वाजता 33/11 केव्ही शहादा शहर उपकेंद्राचे भुमिपुजन, दुपारी 3 ते 4 श्हादा विश्रामगृह येथे राखीव, दुपारी 4 वाजता नंदुरबारकडे प्रयाण व सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथे आगमन राखीव.

दि.16 सप्टेंबर रोजी राजपूत लॉन्स येथे सकाळी 9 वाजता जिल्ह्यातील दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतील नवीन 33/11 केव्ही उपकेंद्राचे ई-भूमिपुजन, सकाळी 11 ते 1 या वेळेत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 ते 2 ही वेळ राखीव आहे.

नंदुरबारातील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात दुपारी 2 वाजता येथे सर्व लोकप्रतिनिधी समवेत बैठक व त्यानंतर दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्यांनतर ते सायंकाळी 5.30 वाजता नागपुरकडे प्रयाण करतील.

उपकेंद्राचे भूमिपुजन-
दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतील 4 उपकेंद्रे- नंदुरबार जिल्ह्यातील बंधारपाडा, कहाटूळ, मोरवड व वेळावद या 4 नवीन उपकेंद्राचे भूमिपुजन होणार आहे. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतील 4 उपकेंद्रे- नंदुरबार जिल्ह्यातील बेडकीपाडा, शहादा, तळोदा व जुने विद्युत भवन नंदुरबार या 4 नवीन उपकेंद्राचे भूमिपुजन होणार आहे.

LEAVE A REPLY

*