अपारदर्शक हस्तांतरण केल्याचा आरोप

0
नंदुरबार / येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात डी.आर.डी.ए . योजने अंतर्गत उभारलेल्या शितगृहाच्या दूरवस्थेची वृत्तमालिका देशदूतमध्ये प्रकाशीत झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयांनी विचारणा केली असता बाजार समितीच्या सचिवाने शितगृहाचे सदोष व अपारदर्शक हस्तांतराचा मुद्या उपस्थित करून चौकशी समितीस दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.
सचिवाला 6 वर्षानंतर सदर हस्तांतरण अपारदर्शक व सदोष असल्याची जाणीव कशी काय झाली? मागील 6 वर्षात त्यांनी सदर मुद्दा जबाबदार संस्थेकडे का उपस्थित का केला नाही? शितगृहाच्या हस्तांतराबाबत कायदेशीर कार्यवाही का करण्यात आली नाही? ती जबाबदारी कोणाची होती? असे प्रश्न यानिमित्त उपस्थित करण्यात येत आहेत.

याबाबत सखोल चौकशी होऊन संबधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

येथील कृषि ऊत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत 100 टक्के अनुदानावर सुमारे 2 कोटी रुपयांचे 500 मे. टन क्षमतेचे शितगृह सुमारे सहा वर्षापुर्वी उभारण्यात आले आहे.

हे शितगृह बाजार समितीला हस्तांतरीत करण्यात आले असून या शितगृहाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी बाजार समितीवर सोपविण्यात आली आहे.

यातून मिळणारे 90 टक्के उत्पन्न बाजार समितीला तर 10 टक्के उत्पन्न जिल्हा परिषदेला मिळणार होते.

परंतू तत्कालीन संचालक मंडळ व विद्यमान सचिवाने हस्तांतर केल्यानंतर शितगृहाचा वापर एक दिवसही शेतकर्‍यांना करु दिला नाही.

त्यानंतर तेथील सामुग्री, वातानुकूलीत यंत्रणा, फर्निचर आदी साहित्य अनधिकृतरित्या विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत दैनिक देशदूतमध्ये वृत्तमालिका प्रकाशित करण्यात आली आहे.

या वृत्तमालिकेची दखल घेवून जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

 

LEAVE A REPLY

*