तळोदा तालुक्यात जलकुंभांचे काम रखडले

0
तळोदा / तालुक्यातील पिपरपाडा, इच्छगव्हाण, सेलवाई, रेटपाडा या गावातील पाणीपुरवठा योजनेतंर्गत बांधण्यात येणार्‍या जलकुंभाचे काम गेल्या काही वर्षांपासून अपूर्ण आहे.
त्यामुळे यासाठी शासनाकडून देण्यात आलेला निधीही वाया जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चारही गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभाचे काम मंजूर करण्यात आले होते. चार वर्षापुर्वी या कामाला सुरूवात झाली होती.
दरम्यानच्या कालावधीत सेलवाई, पिपरपाडा, इच्छागव्हाण येथे जलकुंभाचे काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना हे काम अचानक थांबविण्यात आले होते.

सद्यस्थितीत संबंधित गावात बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जलकुंभाचा उपयोग काय? असा प्रश्न आता ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.

दरम्यान बर्‍याचवेळा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने ग्रास्थांना बोअरवेलद्वारे मिळण्यास मोठया प्रमाणात अडचणी येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

आधीच उन्हाळा असल्याने त्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

*