शहादा येथे आज तिसर्‍या टप्यातील गणेश विसर्जन

0
शहादा । दि.01 । ता.प्र.-शहादा शहरातील तिसर्‍या टप्यातील नवव्या दिवशी 12 गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणूका उद्या दि. 2 सप्टेंबर रोजी निघणार असून त्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे गणेश मिरवणूक व बकरी ईद या दोन्ही सणाच्या पार्श्वभुमिवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या मिरवणूकीत चौधरी मित्र मंडळ, श्री राम राम गणेश मित्र मंडळ, त्रिमुर्ती गणेश मित्र मंडळ, जय बजरंग गणेश मंडळ, संत सेना गणेश मंडळ, जय शिवाजी मित्र मंडळ, इंदिरा मित्र मंडळ, हिंदु हृदयसम्राट मित्र मंडळ आदी मोठे मंडळ सहभागी असणार आहेत.

दरम्यान पाचव्या व सातव्या दिवशी पहिल्या व दुसर्‍या टप्यातील मिरवणूका उत्साहात पार पडल्या. शहरातील विविध वसाहतींमध्ये देखील डिजेच्या तालावर नाचत गणेश भक्तांनी जल्लोष केला.

रात्री 12 वाजेपर्यंत मिरवणूका शांततेत पार पडल्या. दरम्यान पोलीस प्रशासनातर्फे सर्वत्र सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले असून पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.

 

LEAVE A REPLY

*