स्वच्छ संकल्प ते स्वच्छ सिध्दीतंर्गत निबंध स्पर्धा

0
नंदुरबार । दि.01 । प्रतिनिधी-स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छ संकल्पसे स्वच्छ सिध्दी निबंध स्पर्धा व लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून निबंध व लघुपट सादर करण्याची अंतिम दि.8 सप्टेंबरपर्यंत असल्याची माहिती जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या प्राप्त निर्देशानुसार राज्यात स्वच्छ संकल्पसे स्वच्छ सिध्दी निबंध व लघुपट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धेसाठी स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकतो, हा विषय देण्यात आला.
 निबंध मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेत सादर करता येणार असून निबंधसाठी कमाल शब्द मर्यादा 250 राहणार आहे. तर लघु शॉर्ट फिल्मसाठी भारताला स्वच्छ बनविण्याचे माझढे योगदान हा विषय देण्यात आला असून लघुपट सादर करण्याची अंतिम दि.8 सप्टेंबरपर्यंत आहे. लघुपट 2 ते 3 निमीटांचा असावा.

स्पर्धा दोन गटात होणार आहे. पहिल्या गटात 18 वर्षाखालील व दुसर्‍या गटात 18 वर्षावरील व्यक्तींनी सहभागी होता येईल. निबंध व लघुपट स्पर्धेत जिल्ह्यातून दोन्ही गटात प्रथम येणार्‍या स्पर्धकाला 15 हजार रूपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.

तर द्वितीय व तृतीय येणार्‍यांना 10 हजार रूपये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या स्पर्धकांचे निबंध स्पर्ध राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र राहणार आहेत.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय येणार्‍या स्पर्धकांना 51 हजार रूपये, 31 हजार रूपये, 11 हजार रूपये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धकंनी निबंध व लघुपटातील मजकूर असभ्य, भितीदायक, मानहानीकारक, लिंग भेदाधारीत, अश्लिल नसावा, तसेच कोणत्याही कायद्याच्या भंग करणारा नसावा. असे निबंध व लघुपट स्पर्धेतून बाद करण्यात येतील.

स्पर्धे संबंधी अंतिम अधिकार मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. यांच्याकडे राहतील. स्पर्धेतील जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय तरूण, तरूणी, ज्येष्ठ नागरीक यांनी सहभाग नोंदवून आपले निबंध व लघुपट जिल्हा व पाणी स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद येथे दि. 8 सप्टेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

असे आवाहन उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.सारीका बारी यांनी केले आहे. या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

*