जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील गणेश विसर्जन मिरवणूकांना प्रारंभ

0
नंदुरबार/प्रकाशा । दि.31 । प्रतिनिधी/वार्ताहर-नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या टप्यातील सातव्या दिवशी विविध मंडळांचे गणेश विसर्जन मिरवणूका जल्लोषात काढण्यात आल्या.
या मिरवणूकीत विविध वाद्यांच्या तालावर नाचत गणेश भक्तांनी जल्लोष साजरा केला. गणेश भक्ताच्या उत्साला सर्वत्र उधाण आले होते. पोलीस प्रशासनातर्फे मात्र सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यात एकूण 227 गणेश मंडळांनी बाप्पाला निरोप दिला.

नंदुरबार शहरात 29 गणेश मंडळांचे विसर्जन
नंदुरबार शहरात आज 27 सार्वजनिक व दोन खाजगी गणेश मंडळांच्या मिरवणूका काढण्यात आल्या. त्यात एकूण 26 गणेश मंडळे मिरवणूकीच्या रांगेत लागलेली होती. यामध्ये श्रीराम व्यायाम शाळा, द्वारकाधिश गणेश मंडळ, जयहनुमान व्यायाम शाळा, दादा हनुमान व्यायाम शाळा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, दिगंबर नरशी पाडवी आदिवासी गणेश मंडळ, नंदुरबार व्यायाम शाळा, जय भारत व्यायाम शाळा, संत रोहिदास व्यायाम शाहा, संत संताजी व्यायाम शाळा, समर्थ रामदास व्यायाम शाळा, आदर्श व्यायाम शाळा, विर भगतसिंग व्यायाम शाळा, सच्चीतानंद व्यायाम शाळा हे मुख्य मिरवणूकीत सहभागी झाले होते. तर साईज्योत समथा मित्र मंडळ, समर्थ ब्राम्हण पंच, वीर एकलव्य गणेश मंडळ, संत शिरोमणी व्यायाम शाळा, पंडीत नेहरू चौक हातलॉरी गणेश मंडळ, धर्मराज गणेश मंडळ, स्वराज गणेश मंडळ, मातृवंदना प्रतिष्ठा, प्रेरणा हनुमान मित्र मंडळ, मातंग समाज गणेश मित्र मंडळ, वीर गणेश मंडळ आदी मंडळांतर्फे श्रींचे परस्पर विसर्जन करण्यात आले.

या मिरवणूकीसाठी नंदुरबार शहरात 12 पोलीस अधिकारी, 160 पोलीस कर्मचारी, एक एसआरपी प्लाँटून तैनात करण्यात आली होती. या मिरवणूकीचे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात आले व सर्वत्र सीसीटिव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले होते. मंगळ बाजारापासून दुपारी 4 वाजेच्या सुमारास सुरूवात झाली होती. पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी संपूर्ण मिरवणूक मार्गाचा आढावा घेतला. नंदुरबार तालुक्यात देखील 31 गणेश मंडळातर्फे गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

दरम्यान, प्रकाशात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका जल्लोषात निघाल्या. श्रीराम ग्रुपच्या मंडळाचे भक्त डी.जे.च्या तालावर जल्लोषाने नाचत होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्याध्यक्ष शेखर चव्हाण याच्या नेतृत्वाखाली गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

जय श्रीराम मंडळाच्या भक्तांनी आनंद द्विगुणित केला. तसेच श्री वाल्मिक गणेश मंडळ, कोळी राजा ग्रुपने दुपारी 12 वाजता बुधवार बाजारातून शिस्तीने विसर्जन मिरवणूक काढली. दशरथ कोळी, लिंबा कोळी, संजय कोळी, आंबालाल कोळी, संतोष कोळी आदी भक्तांनी गुलाल उधळून बाप्पाला निरोप दिला. दरम्यान गावाच्या सर्वात्मक गणेश मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे भव्य मिरवणूक काढून बाप्पाला निरोप दिला.

हरिभाई दत्तू पाटील यांच्या नेतृत्वाने या गणेश मंडळाची स्थापनाची झाली असून या गणेश विसर्जन मिरवणुकीत गावातील सर्व गणेश भक्त सहभागी होत असतात. भुताताली गणेश मंडळ, मुंजडा गणेश मंडळ, घरगुती गणेश मंडळ यांनी गणेशाचे विसर्जन केले.

दरम्यान पाचव्या दिवशी दादा गणेश मंडळ भरत दादा यांच्या नेतृत्वाखाली दादा गणपती मंडळ स्थापना व विसर्जन झाले. शिवशक्ती गणेश मंडळ, गुप्तेश्वर गणेश मंडळ एकलव्य गणेश मंडळ, भोई राजा गणेश मंडळ, दोस्ती गणेश मंडळ, मुक्तेश्वर गणेश मंडळ, बालाजी गणेश मंडळ, सोनार गणेश मंडळ, पिप्परहाटी गणेश मंडळ, खांडगा गणेश मंडळ आदींनी विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध काढल्या. गणपती बाप्पा मोरया, पुढचा वर्षी लवकर अशा भक्तांनी घोषणा दिल्या.

LEAVE A REPLY

*