आष्टे त.बो. येथे 30 वर्षापासून एक गाव एक गणपती

0
मोड ता.तळोदा । दि.31 । वार्ताहर-आष्टेतर्फे बोरद येथील जय भवानी क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मित्र मंडळातर्फे गेल्या 30 वर्षापासून एक गाव एक गणपती उत्सव सालाबादाप्रमाणे साजरा करण्याची पंरपरा यावर्षीही कायम ठेवत मंडळाने जोपासली आहे.
मंडळातर्फे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तळोदा येथील साईप्रसाद वारकरी भजनी मंडळाचा भजन आणि भारूडाच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी रात्री गणेशोत्सव समितीने केले होते.

योवळी भारूडकार आष्टेतर्फे बोरद जि.प. शाळेचे मुख्याध्यापक कैलास लोहार यांनी भारूडांच्या माध्यमातून, व्यसनमुक्ती, बेटी बचाव, कुटूंब लहान सुख महाजन हा छोटे कुटूंबाचा मंत्र, वृध्द आई वडलांचा संगोपन करण्याची दुरावत चाललेल्या समस्येच्या वर्मावर बोट ठेवत आपल्या आई वडीलाची सेवा करण्याची सल्ला भारूडांच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या गणेश भक्तांना दिला.

या कार्यक्रमात साईप्रसाद वारकरी भजनी मंडळात असलेल्या कैलास लोहार, राजेंद्र वायकर, गुलाबराव चव्हाण, सचिन पाटील, हेमराज माळी, दिगंबर पाटील, मुठाळ, जगन्नाथ मराठे शासकीय कर्मचारी वर्ग असूनही आपली भजन आणि भारूडाच्या माध्यमातून प्रबोधनाचा वसा पुढीचा पिढीतही टिकावा यासाठी प्रयत्नरत सतत राहत असल्यामुळे गणेश उत्सवाचा ठिकाणी आपली सेवा देण्यासाठी नेहमीच आलेला निमंत्रणाचा आनंदाने स्विकार करतात.

त्यामुळे या मंडळाचाही परिसरात चांगले भजनी मंडळाचा लौकीक जनमानसात आहे. या मंडळाने सादर केेलेल्या भजन आणि भारूडांचा कार्यक्रमाला महिला वर्गासह भाविकांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते भरत नवाले, हिरालाल पाटील, नरेंद्र पवार, अमोल नवले, हर्षल नवले, दिपक पवार, रोहिदास पवार, राधेश्याम शिंदे, महेंद्र शिंदे, रोहित नवले, गणेश शिंदे, कृष्ण पाटील, हिरालाल कामनकर, आकाश मंदाणा, योगेश नवले आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*