राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे शिक्षकदिनी धरणे आंदोलन

0
नंदुरबार । दि.31 । प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या आदेशानुसार सर्व समविचारी संघटनांतर्फे विविध मागण्यांसाठी दि.5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील कर्मचार्‍यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर नांद्रे , सचिव एस.एन.पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष राहुल पाटील, कलाध्यापक संघाचे अध्यक्ष प्रदीप देसले, पेन्शन बचाव समितीचे तुषार सोनवणे, विना अनुदानीत कृत्री समितीचे राजेश जाधव आदींनी केले आहे.

या निवेदनात नंदुरबार जिल्ह्यास्तरावर विविध मागण्या करण्यात येणार आहे. त्यात भविष्य निर्वाह खात्याच्या हिशोबाच्या पावत्या विनाविलंब मिळावे.

एप्रिल 2014 पासून बंद करण्यात आलेले 320 कर्मचार्‍यांचे पीएफ खाते त्वरीत सुरू करावे, सन 2016-17 च्या संच मान्यता दुरूस्ती सुचीचे वाटप करून त्रुटीच्या हरकती घेण्यासाठी शिबीराचे आयोजन करावे, वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र कर्मचार्‍यांचे प्रस्ताव सादर करण्याबाबत शिक्षण संस्थांना आदेशीत करावेत, वेतन देयके, वैद्यकीय परीपुर्ती देयके, पीएफ परतावा, पुरवणी देयके, ना परतावा देयके विनाविलंब पारीत करावेत, वेतनत्तेर अनुदान पारीत करावेत, पदोन्नतीचे प्रलंबित मान्यता प्रस्ताव मंजूर करावे, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शाळांची आदिवासी विद्यार्थ्यांची टक्केवारी ठरविण्यासाठी प्रकल्प अधिकार्‍यांना तत्काळ शिफारस करावी, त्याचबरोबर काही धोरणात्मक मागण्या देखील यावेळी करण्यात येणार आहे.

1 व 2 जुलै रोजी 2016 रोजी अनुदान पात्र शाळांना तत्काळ वेतन अनुदान मंजूर करावेत, अघोषीत निधीसह घोषीत कराव्यात सन 2017-18 पासून सरसकट वेतन अनुदान शाळांना मंजूर करून पुढील टप्याचे अनुदान द्यावे, नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्पा अनुदानावरील शाळेतील कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, मुक्त शाळा धोरण रद्द सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी रद्द करून सातवा वेतन आयोग लागू करावा, योजना अंतर्गत शाळांचे योजना बाहय वर्ग करून नियमीत वेतन सुरू करावेत, कला व क्रिडा शिक्षकांया तासिका वाढीसंदर्भात आदेश देण्यात यावेत, मासिक वेतन व पुरवणी देयकांवर कोषागार कार्यालयाकडून एमटीआर 44 अंतर्गत शिक्षणाधिकार्‍यांच्या स्वाक्षरी मागणी होते. ती देयके अधिकक्षक वेतन पथक यांच्या साक्षीदाने स्विकारण्याबाबत आदेश देण्यात यावेत, अल्पसंख्यांक शाळातील नियुक्त कर्मचार्‍यांचे मान्यता शिबीर त्वरीत आयोजित करावेत, समयोजन न केलेल्या शिक्षकांचे मुळ अस्थापनेवरून ऑफलाईन पारीत करावेत, आदी विविध मागण्यांचा समावेश देखील करण्यात आला आहे.

या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित संघटनांच्या सभासदांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*