तलवारीचा धाक दाखवून 22 हजाराची लुट

0
नंदुरबार । प्रतिनिधी-नंदुरबार तालुक्यातील वाका चाररस्ता ते पथराई फाटया दरम्यान एकास तीन अज्ञात व्यक्तींनी तलवारीचा धाक दाखवून त्याच्या जवळील 22 जाराची रोकड लंपास केली.

रज्जाक गफ्फार मन्सुरी रा.बागवान गल्ली (नंदुरबार) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन 22 ते 25 वर्ष वयोगटातील आदिवासी भाषा बोलणार्‍या युवकांनी हातात असलेल्या दोन फुट लांबीच्या तलवारी व लाकडी दांडके याचा धाक दाखवून रज्जाक गफ्फार मन्सुरी व साक्षीदार मोहम्मद आवेश साद्दीक धोबी हे मोटरसायकलने नंदुरबारकडे येत असतांना एका लाल रंगाच्या हिरो कंपनीच्या मोटरसायकलने तिघा अज्ञात चोरटयांनी त्याचा पाठलाग केला व त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेली काळया रंगाची रेगझीन बॅग त्यांनी ताब्यात घेतली.

यामध्ये 22 हजाराची रोकड लंपास केली. याप्रकरणी रज्जाक मन्सुरी याने दिलेल्या फिर्यादीनुसार, उपरगर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरटयांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबारातून मोटरसायकल लंपास
नंदुरबार। प्रतिनिधी- नंदुरबार येथील मारोती मंदिरासमोरील पेट्रोलपंपाच्या बाजूस असलेली मोटरसायकल अज्ञात चोरटयांनी लंपास केली. अशोक रमेश कुंभार रा.मोठामारूती जैन पेट्रोल पंपाच्या बाजूला याने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरटयांनी त्याच्या घरासमोर त्याची मालकीची 25 हजाराची मोटरसायकल लंपास केली. याप्रकरणी अज्ञात चोरटयांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*