मुख्याध्यापकांनी शाळेच्या गुणवत्तेवर भर द्यावा- तेजोराव गाडेकर

0
तळोदा । दि.31 । ता.प्र.-मुख्याध्यापकांनी शाळेच्या गुणवत्त्ेवर लक्ष घालावे जेणेकरून विद्यार्थी शिक्षीत होवून भविष्यातील पिढी गुणवंत पिपजेल असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी तेजोराव गाडेकर यांनी मुख्याध्यापक सहविचार सभेत केले.
अप्रशिक्षीत शिक्षक, वेतनातील त्रुटी स्पर्धा परीक्षा, अतिरीक्त शिक्षक समायोजन व अन्य शैक्षणिक विषयांवर मुख्याध्यापक सभेचे आयोजन श्रॉफ हायस्कुल येथे करण्यात आले होते.
यावेळी उपशिक्षणाधिकारी रोकडे, वेतनपथक अधिक्षक एस.आय. चव्हाण, विज्ञान तज्ञ दिनेश देवरे, मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह, विद्या सचिव निमेश सुर्यवंशी, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष जयदेव पाटील, दत्तात्रय सुर्यवंशी, रफिक जहांगीरदार, बिर्‍हाडे आदी उपस्थित होते.

यावेळी वेतन पथक अधिक्षक यांनी देयके वेळेवर व उपस्िित होते. यावेळी वेतनपथक अधिक्षक यांनी देयके वेळेवर व अचुक सादर करावी असे आवाहन केले. भविष्यनिर्वाह निधीचा हिशोब सर्वांना लवकर देण्याचे आश्वासन केले.

भविष्य निर्वाहनिधीचा हिशोब सर्वांना लवकर देण्याचे आशवासन दिले. दिनेश देवरे यांनी एन.टी.एस., एन.एम.एम.एस यावर मार्गदर्शन केले.

प्रसंगी मार्गदर्शन करतांना शिक्षणाधिकारी तेजोराव गाडेकर यांनी सांगितले की, शिक्षणहक्क कायद्यान्वये शिकवण्यासाठी प्रशिक्षीत शिक्षकच आवश्यक आहे व तस ठराव संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केला आहे.

याबाबत शाळांमध्ये अप्रशिक्षीत शिक्षक नसल्याचे हमीपत्र मुख्याध्यापकांकडून लिहून घेतले. अप्रशिक्षीत शिक्षक असतील तर 31 मार्च 2019 पर्यंत त्यांनी प्रशिक्षीत व्हावे असे आवाहन केले.

दि.1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक शाळेतर स्वच्छता पंधरवाडा साजरा करावा यात स्वच्छता शपथ, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी, गीतगायन, ग्रामस्वच्छता, चित्रकला, वादविवाद स्पर्धांचे आयोजन करावे. असे आवाहन यावेळी शिक्षणाधिकार्‍यांनी सर्व उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करतांना केले. सर्व मुख्याध्यापक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

सुटीच्या दिवशीच शिक्षक दिनाचे कार्यक्रम घ्यावे
दि.5 सप्टेंबर शिक्षक दिनाला अनंत चतुर्दशीची सुटी असली तरी हा शिक्षक गौरव दिवस असल्याने कार्यक्रमांचे आयोजन करून तसा अहवाल पाठवण्याची सूचना केली.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र यातील तरतूदीनुसार प्रत्येक शाळेत गुणवत्ता कक्ष स्थापन करावा, शाळाबाहय विद्यार्थी शोधकेंद्र सुरू करावे. ज्ञानरचनावादवर भर द्यावा, स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी तयार करावेत शालेय आवारात व शालेय परिसरात तंबाकू गुटका, धुम्रपान केले जाणार नाही याची काळजी घ्यावी.

त्यासंबंधी प्रतिबंधात्मक सूचना चित्रीत कराव्यात व शाळा 100 टक्के तंबाकू मुक्त करावी असे आवाहन केले.

 

LEAVE A REPLY

*