कोचरा फाट्याजवळ गुरांची अवैध वाहतूक

0
ब्राम्हणपुरी । वार्ताहर-शहादा- खेतीया रस्त्यावर कोचरा फाटयाजवळ अवैध गुरांची वाहतुक करणारी रिक्षा म्हसावद पोलीसांनी जप्त केली. या कारवाईत रिक्षासह एकुण 1 लाख 35 हजारांचा मुदेमाल जप्त करण्यात आला.
बकरी ईद व गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने गुरांची अवैध वाहतुक होवू नये, त्यामुळे म्हसावद पोलीस स्टेशनने महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवरील खेडदिगर येथे पोलीसांनी नाकाबंदी केली आहे.
पो.कॉ. राकेश मोरे व विजय न्हावडे हे दि.28 रोजी गस्त घालत होते. यावेळी रात्री 10 वाजेच्या सुमारास कोचरा ते रायखेड दरम्यान रिक्षा (क्र.एम.एच.15 बी.जे. 7084) टाटा एस छोटाहत्ती पांढर्‍या रंगाची रायखेडकडे अंधाराचा फायदा घेत भरधाव वेगाने जातांना दिसली.

यावेळी गाडीचा पाठलाग करून रायखेड ते खेतीया रोडवर कोचरा फाटयाजवळ अडवली. त्यात तीन गायी कोंबून निदर्यतने वाहतुक करीत असल्याचे दिसून आले.

मालवाहु रिक्षा चालकास याबाबत विचारले असता सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली व नंतर तिन्ही गायी ठाकरे नावाच्या व्यक्तीने कुरंगी येथून गाडीत चढवून शहादा येथील सलमान व अजमल कुरेशी अशांना विकले असे सांगितले.

सदर वाहनाचा परवाना नसल्याने असे वाहन चालकाने सांगितले. सदर 45 हजार किंमतीचे तीन गायी व 90 हजार किमतीची पांढर्‍या रंगांची रिक्षा असा एक लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त करून म्हसावद पोलीस स्टेशनला आणले.

चालक सुरेश राजु चित्रकथे रा.विजयनगर शहादा यांच्या वाहनात तीन गायी वाहनात कोंबुन वाहनात बसण्याची व उभे राहण्याची व्यवस्था नसतांना व चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांचे मानेस घट्ट दोर बांधून निदर्यतेने वाहनात कोंबून, परमिट नसतांना गायीची अनाधिकृत वाहतुक करतांना सापडलेल्या चालकावर प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 9 व पशु कु्ररता अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (ड) सह मो. वा.का.क. 66/192 अ सह भादं कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.कॉ. विजयकुमार न्हावडे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*