वनविभागातर्फे 55 हजाराचे सागवानी लाकूड जप्त

0
नवापूर । प्रतिनिधी-वनविभागातर्फे आज उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा श्रीमती पीयुषा जगताप, सहायक वनसंरक्षक नंदुरबार जी.आर.रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली घातलेल्या धाडीत 55 हजाराचा अवैध सागवानी लाकूडसाठा जप्त करण्यात आला.

मिळालेल्या गुप्त बातमीवरुन वनक्षेत्रपाल नवापुर आर.बी.पवार, वनपाल विक्री आगार पी.बी.मावची.वनपाल वडकळंबी ए.एन.जाधव.वनरक्षक उकाळापाणी एस.बी.गायकवाड, वनरक्षक कुंकराण अमोल काशिदे,वनरक्षक बी.बी.गायकवाड बारी, बी.एस.साळवे,वाहनचालक ,माजी सैनीक नाना पिंपळे,सुरेश मोरे,यांचा सह शासकीय जीपने मौजे.सागीपाडा गावात जाऊन गस्त केली असता घराचा बाजुला ताडपञी खाली अवैध्य रित्या साग लाकुड चौकट नंग 36 घन मीटर 1.785 . तसेच जप्त केलेल्या मालाची किंमती 55 हजार 325 रुपयाचा माल हस्तगत केला.याप्रकरणी वनपाल विक्री आगार नवापुर यांनी लाकूड तस्करांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

LEAVE A REPLY

*