बोरद येथील सेंट्रल बँकेत अपूर्ण कर्मचार्‍यांमुळे नागरिकांचे हाल

0
चिनोदा ता. तळोदा । वार्ताहर- बोरद येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत अपूर्ण कर्मचारी असल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
तसेच बँक मॅनेजर यांचा मनमानी कारभाराला जनता कंटाळले असून नवीन मॅनेजरची नेमणूक करून कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी अशी मागणी बोरद व परिसरातील नागरिकांनी नाशिक येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाकडे केली आहे.

बोरद येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेला परिसरातील 22 गावे जोडली आहेत. तसेच बोरद गाव हे तालुक्यात सर्वात मोठे गाव असून बोरद गावाची लोकसंख्या 10 हजारापेक्षा वर आहे. सेंट्रल बँकेत मॅनेजरसह तीनच कर्मचारी आहेत.

या बँकेत शिक्षक पेन्शर्स, संजय गांधी, इंदिरा गांधी, वृद्धपकाळ योजना, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी, घरकुल लाभार्थी आदींची एकच झुंबळ उडत असते. ग्राहकांना तासंतास उभे राहावे लागत असते. तसेच आधार कार्ड लिंकिंग करणे शासनाने सक्तीचे केले आहे.

त्यामुळे आधार लिंकिंगसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तसेच बँक मॅनेजर ग्राहकांशी उद्घतपणे वागत असतात, दमदाटी करतात. ग्राहकाना अपशब्द तसेच अपमानास्पद वागणूक देतात.

त्यांच्या मनमानी कारभाराला ग्राहक कँटाळले आहेत. तरी महाशयांनी बँक कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी, व मॅनेजर यांची बदली करा,अन्यथा त्याच्या वागणुकी बद्दल ताकीद द्यावी. अशी मागणी बोरद व परिसरातील नागरिकांनी नाशिक विभागीय कर्मचार्‍यांकडे निवेदनातून केली आहे.

या निवेदनावर 56 ग्राहकांच्या सहया आहेत. प्रामुख्याने दिलीप निकम, इंदास पावरा, जमिल शेख,गजेंद्र राजपूत, नामदेव शिंपी, युनूस हैदर तेली, जोग्या नाईक, दीपक राजपूत, गौतम ढोडरे आदींच्या सह्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*