नंदुरबार जिल्ह्यात सात दारु अड्ड्यांवर धाड

0
नंदुरबार । प्रतिनिधी-नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध सण व उत्सवांच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी जिल्हा पोलीस दलातर्फे अवैध गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज नंदुरबार जिल्ह्यात स्थनिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पाच पथके पाठविण्यात आली.

नंदुरबार शहर, अक्कलकुवा, तळोदा, नवापूर व विसरवाडी याठिकाणी अवैध गावठी दारू बेकायदेशीरपणे विक्री करणार्‍यावर धाड टाकण्यात आली. यामध्ये सात आरोपींना 54 हजाराचा मद्देमालासह अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, असई अनिल गोसावी, रविंद्र लोंढे, हे.कॉ. पंढरीनाथ ढवळे, चंद्रकांत शिंदे, रविंद्र पाडवी, विकास पाटील, योगेश, सोनवणे, पोलीस नाईक, दिपक गोरे, जगदिश पवार, भटु धनगर, गोपाल चौधरी, संदिप लांगडे, पोलीस शिपाई मोहन ढमटेरे, पंकज महाले, राहुल भामरे, जितेंद्र अहिरराव, विकास अजगे, अमोल पवार, तुषार पाटील, विनोद जाधव यांच्या पथकाने केली.

पुढील काळात देखील ही कारवाई सुरू राहणार आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*