ग्रामीण भागात दहाची नाणी स्वीकारण्यास बँकेचा नकार : बामखेडा परिसरातील नागरीक त्रस्त

0
नंदुरबार |  प्रतिनिधी :  बामखेडा त.त. परिसरात दहा रुपयांचे नाणे सध्या कोणीच स्वीकारण्यास तयार नसल्याने याबाबत संंभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बामखेडा परीसरातील वडाळी, तोरखेडा,जयनगर आदी गावांमध्ये दहा रुपयांची नाणी बंद झाल्याची अफवा पसरली आहे. याबाबत बँकेत संपर्क साधला असता बँक शाखेत दहा रुपयांचे नाणे स्वीकारले जात नाही.

दहा रुपयाचे नाणे अधिकृतरित्या बंद झाले नसल्याने ते नाकारण्याचे कारणच नाही, असे ग्रामीण भागातील नागरीकांचे म्हणणे आहे.तसेच वडाळी येथील परीसरातील मोठे बाजारपेठ गाव असल्याने खेड्या-पाड्यावरील आदिवासी नागरिक त्यांच्याजवळील असलेले नाणे बाजारपेठेत व्यापारी स्वीकारत नसल्याने त्यांची मोठी पंचाईत निर्माण झाली आहे.

किराणा दुकानात गेले तरी दहा रुपयांचा डॉलर घेण्यास नकार दिला जातो. दहा रुपयांच्या नाण्यांचे करायचे काय? असा प्रश्‍न परिसरातील जनतेला पडला आहे. मोदी सरकारने पाचशे, हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्या त्या बँकेत भरण्यासाठी मुदत दिली होती.

आतातर अचानक बँकेत नाणे स्वीकारत नसल्याने बामखेडा परिसरातील नागरिक संभ्रमात पडले आहे. एखाद्या व्यावसायिकाने नाणे घेण्यास नाकारले तर दुसराही घेत नाही.

सध्या दहा रुपयांच्या डॉलरबद्दल संभ्रमाचे वातावरण असल्याने भारतीय रिझर्व्ह बँक किंवा तत्सम अधिकार्यांनी या संदर्भात खुलासा करावा,अशी मागणी परिसरातून होत आहे.

दहा रुपयाचे नाणे जर बंद झाले नसेल तर आमजनतेचे नाणे नाकारण्याचे कारण काय ? हॉटेल, किराणा व्यावसायिक, भाजी विक्रेते, किरकोळ व्यावसायिक, बँक असे कोणीही दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास तयार नाही.

नागरिकांमधून बँकांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. दहा रुपयाच्या नाण्याची देवाण-घेवाण बँकेत सुरळीत व्हावी अशीही मागणी परिसरातून होत आहे.

दहा रूपयाची नाणी बँकांनी स्विकारणे गरजेचे असून तसा आदेश असल्यास जाहीर नोटीस बोर्डवर लावावा. अशी अपेक्षा बँकेचे ग्राहक करीत आहेत.

LEAVE A REPLY

*