वडाळी येथे ‘एक गाव एक गणपती’ अध्यक्षपदी अबिद खाटीक

0
कोंढावळ । वार्ताहर-एक गाव एक गणपती मंडळाचे अध्यक्षपदी आबिद खाटीक व उपाध्यक्षपदी सागर निकम यांची निवड करण्यात आली. गावातील सामाजिक एैक्याचे दर्शन या निमित्ताने सर्वाना दिसून आले.
शहादा तालुक्यातील वडाळी येथे नुकतीच शांतता कमिटीची बैठक झाली. यावेळी बैठकीस सारंगखेडा पोलीस स्टेशनचे एपीआय मनोहर पगार व वडाळीचे पोलीस पाटील गजेंद्र गोसावी तंटामुक्ी अध्यक्ष पांडूरंग गोसावी, पं.स. सदस्य गिरीश जगताप, पीक संरक्षण चेअरमन प्रकाश जगताप, जयेश माळी, तुषार गोसावी, मनोज मिस्तरी, छोटू माळी, या बैठकीत एक गाव एक गणपती नियोजन करण्यात आले.

साई महिमा मंडळाचे अध्यक्षपदी आबिद खाटीक, उपाध्यक्षपदी सागर निकम, सचिव राकेश माळी, खजिनदार भाऊसाहेब माळी, सल्लागार सतिष माळी, सदस्य स्वप्निल गोसावी, किरण माळी यांची निवड करण्यात आली.

तसेच याप्रसंगी सारंगखेडा पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज पगारे यांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना कायम राहावी आणि यामध्यमातून मंडळाने विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करावे.

त्यात रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, सांस्कृतीक कार्यक्रम, व्याख्याने, किर्तन आदी नियोजन करून समाजाला एक नविन बोध देता येईल यासाठी प्रयत्न करावे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुषार गोसावी यांनी केले तर आभार ललित गोसावी यांनी मानले.

या सर्व कार्यक्रमात गावातील नागरीकांनी सहभागी व्हावे व सामाजिक एकतेचे दर्शन घडवावे असे आवाहन मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*