नवापूर । दि.24 । प्रतिनिधी-आगामी गणेशोत्सव व बकरी ईद हे सण नागरीकांनी गुण्यागोविंदाने साजरे करून कायद्याचा आदर करावा. नवापूर तालुक्याचा इतिहास पाहता येथील नागरीक नेहमीच प्रशासनाला सहकार्य करीत असून जिल्ह्यातील एक आदर्श तालुका आहे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी निमा आरोरा यांनी केले.
पोलीस व महसूल प्रशासनातर्फे आगामी सण उत्सव संदर्भात आयोजीत शांतता कमिटीच्या बैठकीत श्रीमती अरोरा बोलत होत्या. पोलीस ठाण्याच्या आवारात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपअधिक्षक रमेश पवार होते.

जि.प.अध्यक्षा रजनी नाईक, माजी जि.प.अध्यक्ष भरत गावित, तहसिलदार प्रमोद वसावे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस उप अधिक्षक रमेश पवार यांनी दादा व बाबा गणपतीची हरीहर भेटीची जागा, येणार्‍या भाविकांचा विचार करून ती बदलण्याचा निर्णय घेतला.

ईतर ठिकाणीही अशा पध्दतीने त्या मंडळाचा पदाधिकार्‍यांनी निर्णय घ्यावा, वरिष्ठ पातळीवर याची दखल घेण्यात आली आहे. गाव शांत तर देश शांत ही नवापूरकरांची भावना वाखाणण्याजोगी आहे.

याप्रसंगी भरत गावित यांनी गणेश मंडळाची बाजू मांडताना सांगितले की प्रत्येक गणेश मंडळ प्रशासनाचा आदर करीत असून कोणीही शांतता कमिटीच्या पुढे जाणार नाही आशी ग्वाही देउन मंडळानी पारंपरिक व शास्त्रोक्त पध्दतीने श्री गणरायाची स्थापना व विसर्जन करावे अशी सूचना मांडली.

जि.प.आध्यक्षा रजनी नाईक यांनी, उत्सव काळात विज पूरवठा खंडीत होणार नाही यासाठी विज कंपनीने पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, याप्रसंगी घनश्याम परमार, पमा सैय्यद, हसमुख पाटील, किरण टिभे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक करताना पोलीस निरीक्षक राजपूत यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.गोपाळ पवार यांनी केले. आभार पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*