कळंबू येथे क्षारयुक्त पाणीपुरवठा : विविध आजारांची लागण, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

0
कळंबू | वार्ताहर :  कळंबू गावात क्षारयुक्त व खारट पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देवून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कळंबू हे ४५०० लोकवस्तीचे गांव असून तापी नदीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे. गावाला होणारा पाणीपुरवठा अगोदर कळंबू शिवारातील म्हैस नदीच्या पात्रातील कुपनलिकेच्या सहाय्याने करण्यात येत होता.

परंतु दिवसेंदिवस कमी होणारा पावसाळा यामुळे कुपलिकांची पाण्याची पातळी खालावल्यामुळे पाण्याचा प्रश्‍न अधिक गंभीर झाला. शासनाच्या २०१६ ते २०१७ च्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कळंबू गावाला टेंभे शिवारातील म्हैस नदीच्या पात्रातून कुपनलिकेच्या सहायाने तीन किलोमीटरच्या अंतरावरून पाणीपुरवठा केला जात आहे.

परंतु होणारा पाणीपुरवठा हा क्षारयुक्त व खारट असल्याने पिण्यायोग्य नाही. परिणामी पाण्यामुळे पोटदुखी, हगवण, अंगखाजणे, असे आजार होत अहेत.

पाणी स्वयंपाकासाठीही उपयोगी नसल्याने गेल्या काही वर्षापासून येथील ग्रामस्थ सारंगखेडा येथून पाणी मिळेल त्या साधनाने आणून आपली तहान भागवत आहेत.

याबाबत वेळोवेळी वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित करूनही ग्रामपंचायत प्रशासन व जिल्हा प्रशासन कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे समस्या अधिकच गंभीर होत चालली आहे.

या समस्यकडे ग्रामपंचायतीने शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून शुूध्द पाण्यासाठी कायमस्वरूपी योजना कार्यान्वित करावी जेणेकरून कळंबू वासीयांची पाण्यासाठीची भटकंती थांबेल अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*