वाण्याविहीर ग्रा.पं.ला स्मार्ट ग्रामपुरस्कार

0
मोदलपाडा ता.तळोदा । वार्ताहर-अक्कलकुवा तालुक्यातून वाण्याविहिर येथील ग्रांमपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त पालकमंञ्यांच्या हस्ते सरपंच अशोक पाडवी यांना दहा लाखाचा धनादेश व पारितोषिक वितरण.
अक्कलकुवा हा जिल्ह्यातील आदिवासी बहूल तालुका असून आजही तालुक्यात अनेक समस्या कायम आहेत. माञ शासनाच्या विविध योजनांमूळे अलीकडे विकासाची गंगोञी गावपातळीवर पोहोचू लागली आहे.

दुर्गम अतिदुर्गम भागाकडे शासनाचे विशेष लक्ष असल्याने तालुक्यातील ग्रांमपंचायती सक्षम होत असून गावपातळीवरील समस्या दिवसेंदिवस कमी होत आहेत.व शासनाच्या अनेक समाजपयोगी योजनांचा लाभ जनतेला मिळू लागला आहे.

खेड्यापाड्यांवर रस्ते,आरोग्य,पिण्याच्या पाण्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे.या योजनेअंतर्गत गावात स्वच्छ पाणीपूरवठा,आरोग्य व सौरऊर्जेच्या विकासाला महत्व देण्यात आले आहे.

अक्कलकुवा तालुक्यात 193 च्या जवळपास गावपाडे आहेत.सन 2016/17 या वर्षातील शासनाच्या ग्रामविकासाअंतर्गत येणा-या स्मार्ट ग्राम म्हणून वाण्याविहीर ग्रुप ग्रामपंचायतीची अक्कलकुवा तालुक्यातून स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत निवड करण्यात आली व नंदुरबार येथिल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ध्वजवंदना वेळी पालकमंञी ना.जयकुमार रावल यांच्या शुभहस्ते वाण्याविहीर ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक दौलतसिंग पाडवी व वाण्याविहीरचे ग्रामसेवक ए.बी.शिरसाठ यांना स्मार्ट व्हिलेजचा पुरस्कार प्रमाणपञ व दहा लाख रूपयाचा धनादेश देवून गौरवण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, जि.प.अध्यक्षा रजनी नाईक व अधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*