परिवर्धा येथे दोन गटात हाणामारी

0
नंदुरबार । दि.18 । प्रतिनिधी-शहादा तालुक्यातील परिवर्धा येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी दोन गटातील 20 जणांविरूध्द पस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकास 11 जणांनी बेदम मारहाण केली. प्रविण गुलाब ठाकरे रा.परिवर्धा (ता.शहादा) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, किरकोळ कारणावरून त्याच्या पत्नीचा विनयभंग करून त्याला 11 जणांनी बेदम मारहाण केली.

याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात सुरेश कुत्र्या पवार, निराकर जामसिंग ठाकरे, टायगर सुरेश पवार, अभिलाश निराकर ठाकरे, सुनिल छगन भिल, सिकंदर सुकदेव ठाकरे, अरूण किरसिंग पवार, एकनाथ जामसिंग ठाकरे, शर्मिला सुरेश पवार, रूख्मीणीबाई भिल्या ठाकरे, शिला निराकर ठाकरे सर्व रा.परिवर्धा (ता.शहादा) यांच्याविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान सुरेश कुत्र्या पवार याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील भांडणाची कुरापत काढून त्यास रविंद्र गुलाब ठाकरे, गुलाब मालसिंग ठाकरे, जालम मानसिंग ठाकरे, रविंद्र जालम ठाकरे, अदन जालम ठाकरे, छायाबाई जालम ठाकरे, ताईबाई गुलाब ठाकरे, ममताबाई गुलाब ठाकरे सर्व परिवर्धा (ता.शहादा) यांनी धारदार शस्त्राचा वापर करून व कुदळीचा वापर करून सुरेश पवार व सुनिल जाधव या दोघांना मारहाण करून जखमी केले.

याप्रकरणी आठ जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत विविध धारदार शस्त्र व कर्‍हाडीचा वापर करण्यात आल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. याबाबत पोलीसांनी संबंधित व्यक्ती विरूध्द कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

 

LEAVE A REPLY

*