शहादा पालिकेत राडा

0
शहादा / विकास कामांच्या मुद्यावरून झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याची घटना आज पालिकेच्या आवारात दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली.
नगरसेवक संजय साठे व माजी नगरसेवक संजय ताराचंद चौधरी या आजीमाजी नगसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
पोलीस घटनास्थळी लागलीच दाखल झाल्याने मोठा अनर्थ टाळला. पालिकेच्या आवारातील हा दांगडो पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

येथील पालिकेची विशेष सभा आज सकाळी 11 वाजता घेण्यात आली. सभेच्या कामकाजात पाच विषय होते.

या सर्व विषयांवर वादळी चर्चा होणार असल्याची शक्यता असल्याने वातावरण गरम बनले होते. सभा संपल्यानंतर पालिकेच्या मुख्य कार्यालयाबाहेरील आवारात उपनगराध्यक्षा रेखा चौधरी यांचे दीर संजय ताराचंद चौधरी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचे पुत्र अभिजीत पाटील, नगरसेवक प्रशांत निकुंभ, नगरसेवक संजय साठे, संदिप चौधरी यांच्यात विकास कामांवरून चर्चा सुरू होती.

सुरूवातीला साधारण वाटणारी ही चर्चा गंभीर वळण घेेईल असे कोणालाही वाटले नव्हते. शाब्दीक चर्चेत आरोप प्रत्यारोपाने पुढे गंभीर वळण घेतले.

एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार घडत असतांना नगरसेवक संजय साठे व माजी नगरसेवक संजय चौधरी यांच्यात सिनेस्टाईल हाणामारी झाली.

त्या दोघा आजी माजी नगरसेवकांमधील हाणामारीचे वृत्त शहरात पोहचताच दोघांच्या समर्थकांनी पालिकेच्या आवारात गर्दी केली.

त्यावेळी काहींच्या हातात क्रिकेटच्या बॅटाही होत्या. या तुंबळ हाणामारीचे वृत्त पोलीसांना कळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, ताफ्यासह घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.

 

LEAVE A REPLY

*