नरेंद्र बागले,शहादा । दि.17 – अध्यापक विद्यालयात अध्ययन करताना नंदुरबार जिल्ह्यातील प्रतापपूरचे रहिवासी जितेंद्र कोळी यांना सीमा पाटील या विद्यार्थीनीने भाऊ मानून 16 वर्षापुर्वी राखी बांधली होती. त्यांनीही राखी अद्यापपर्यत राखून ठेवली.
पारोळा तालुक्यातील चोरवड येथे कार्यरत प्राथमिक शिक्षीका सीमा पाटील या 16 वर्षांपूर्वी धुळे येथील शासकीय अध्यापक विद्यालयात शिक्षण घेत होत्या.
सन 2001 मध्ये जितेंद्र कोळी (रा.प्रतापपूर ता.तळोदा) हेदेखील सोबत शिक्षण घेत होते. रक्षाबंधनाच्या दिवशी सिमा यांच्या मैत्रिणींचे भाऊ शाळेत आल्याने त्या आनंदात होत्या.

मात्र, त्यांना भाऊ नसल्याने त्या वर्गात बसून रडत होत्या. त्यावेळी जितेंद्र हे वर्गात आले. त्यांनी सिमा यांना बहिण मानले अन् राखी बांधून घेतली.

पुढच्या वर्षीही घरी येवून त्यांनी राखी बांधली होती. दरम्यान, सिमा यांचे लग्न झाले तेव्हा त्यावेळी जितेंद्र यांनी भावाचे कर्तव्य निभावून आदर्श उभा केला.

दरम्यान, सिमा यांनी पहिल्यांदा ज्यावेळी जितेंद्र यांना रक्षाबंधनाच्या दिवशी 16 वर्षांपूर्वी जी राखी बांधली होती, ती जितेंद्र यांनी अद्यापही सांभाळून ठेवली होती.

व सिमा या जितेंद्र यांना राखी बांधण्यासाठी येतील, तेव्हाच त्यांच्या हाताने पुन्हा ती बांधेल, असा जितेंद्र यांचा मानस होता. तो पूर्ण झाला.

सीमा या त्यांना भेटण्यासाठी आल्या व तीच राखी पुन्हा जितेंद्र यांनी काढून पुन्हा बांधली. तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले होते.

सिमा पाटील या इतिहासप्रेमी व प्राथमिक शिक्षक प्रेमचंद अहिरराव यांच्या पत्नी आहेत.

डबीत ठेवली राखी
जितेंद्रच्या चुलतभावाचे गेल्यावर्षी निधन झाले. माहिती मिळताच अध्यापक विद्यालयात शिक्षण घेणार्‍या काही मैत्रिणींसोबत सीमा या प्रतापपूरला आल्या होत्या.

त्याचवेळी जितेंद्रच्या आईने एक डबी आणली. 16 वर्षांपूर्वी त्याला सीमा यांनी बांधलेली राखी होती. दरवर्षी हीच राखी तो रक्षाबंधनाला बांधून घेत असल्याचा उलगडा या भेटीत झाला होता, हे विशेष.

 

LEAVE A REPLY

*