Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच नंदुरबार मुख्य बातम्या

# Video # मुख्यमंत्र्यांचा दोंडाईचा दौरा नी लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यावर पोलिसांची कारवाई

Share

नंदुरबार । दि. 26 । प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोंडाईच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह 50 ते 60 कार्यकर्त्यांवर दंडेलशाही करत ताब्यात घेतले.

मुंबईतील उलगुलान मोर्चानंतर महिना होऊनही आदिवासींच्या समस्या सोडविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते नाराज होते. आपली नाराजी मुख्यमंत्र्यांना कळावी म्हणून हे सर्व कार्यकर्ते दोंडाईचा हद्दीतील मुख्यमंत्र्यांच्या दोर्‍याच्या रस्त्यावर उभे होेते. त्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांनी मुख्यमंत्र्याां ताफा सुरळीत पुढे जावा म्हणून या कार्यकर्त्यांवर दंडेलशाही करत त्यांना ताब्यात घेतले.

या घटनेचे व्हिडीओ पाहा

 

व्हिडीओ संकलन : राकेश कलाल देशदूत डिजीटल नंदुरबार

धर्मा पाटील यांच्या पत्नीसह मुलगाही ताब्यात
दरम्यान संपादीत केलेल्या शेत जमीनीचा कमी मोबदला दिल्याप्रकरणी दोंडाईचा येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालया विष पिवून आत्महत्या केली होती. त्यांनतर दोन ते तीन महिन्याने शासनाने त्यांच्या पत्नी व मुलास काही प्रमाणात भरपाई दिली होती. परंतू ती अल्प असल्याने धर्मा पाटील यांच्या मुलाने मंत्रालयात खेटे मारले होते. त्यापार्श्वभूमीवर दोंडाईचा येथे आज मुख्यमंत्री येत असल्याने त्यांचा दौरा निर्विघ्न व्हावा म्हणून पोलिसांनी मयत धर्मा पाटील यांच्या पत्नी व मुलावर प्रतिबंधात्मक कारवाई करत सकाळपासून दोंडाईचा पोलिस ठाण्यात जमा केले होते. मुख्यंत्र्यांच्या दौरा संपल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!