ट्रक-मोटरसायकलच्या धडकेत तरूणीचा मृत्यू; एक गंभीर

0
नंदुरबार । प्रतिनिधी-नवापूर शहरातील धुळे-सुरत महामार्गावरील फॉरेस्ट चेकनाकाजवळ भरधाव ट्रकने समोरून येणार्‍या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.

बालू शांतीलाल गावीत रा.बंधारपाडा बाजारफळी ता.सोनगड जि.तापी याने दिलेल्या फिर्यादीनुसार, नवापूर फॉरेस्ट चेकनाक्याजवळील धुळे-सुरत महामार्गावर ट्रक (क्र.एम.पी.3615) वरील चालकाने आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व भरधाव वेगाने चालविले असता समोरून येणारी मोटरसायकल (क्र.जी.जे.26, पी.1700) ला जोरदार धडक दिली.

या अपघातात कु.हिना नरेश काथुड (वय 17) रा.जामकी ता.उच्छल जि.तापी (गुजरात) ही जागीच मयत झाली, तर जयेश बालू गावीत (वय 17) रा.बंधारपाडा हा गंभीर जखमी झाला.

अपघात घडताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

LEAVE A REPLY

*