मोदलपाडा ता.तळोदा । दि.11 । वार्ताहर-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य हे देवाधर्माच्या विरोधात नाही. देवा-धर्माच्या नावावर होणार्‍या शोषण व फसवणुकीच्या विरोधात अंनिसचे कार्य असून अंनिसची भूमिका ही व्यापक समाज परिवर्तनाची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तळोदा शाखेतील कार्यकर्त्याच्या प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन सत्राच्या वेळी ते बोलत होते.

प्रशिक्षण सत्राला उदघाटक म्हणून समाजकार्य महाविद्यालायचे प्राचार्य धनंजय माळी होते. अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.डी.बी.शेंडे, यावेळी विचार मंचावर, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रा.डॉ.प्रशांत बोबळे, बुधावलीचे सरपंच सुरेश पाटील, आर.डी.साळवे, सुभाष भूजबळ, जिल्हा सचिव खंडू घोडे, राजेश गुलाले आदी उपस्थीत होते.

श्री.सावळे पुढे म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या धर्म व उपासना स्वातंत्र्याचा अंनिस आदर करते. भारतीय संविधानाच्या मर्यादेत राहूनच अंनिस आपले कार्य करते.

अंनिस समाजात वैज्ञानिक दृष्टीकोणाचा प्रचार व प्रसार करून समाज विवेकी बनविण्याचा प्रयत्न करते, असेही ते म्हणाले. उदघाटन नंतरच्या सत्रात अंनिसच्या तळोदा शाखेतील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

त्यात कार्यकर्त्यांना अंनिसची वैचारिक भूमिका, कामकाजाची पद्धती, संघटना बांधणी, उपक्रम, चमत्कार सादरीकरण आदी विषयांवर माहिती व प्रशिक्षण देण्यात आले.

शिबीर यशस्वीतेसाठी तळोदा शाखा सचिव प्रा. कमलेश बेडसे, मुकेश कापुरे, प्रा.राजू यशोद, अमोल पिंपळे, फुंदीलाल माळी, विजय भामरे, एस.आर.मुके आदींनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*