नवापूर एस.टी.आगारामार्फत 114 सरपंचांची कार्यशाळा

0

नवापूर । दि.11 । प्रतिनिधी-एस.टी.आगार विभागामार्फेत तालुक्यातील 114 सरपंचांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगारप्रमुख राजेंद्र अहिरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन लेखाकार बी.एन.बाविस्कर, सहायक कार्यशाळा अधिक्षक वाय.एस. शिवदे, सहायक वाहतुक निरीक्षक नाना भामरे, वसंत गावीत उपस्थित होते.

यावेळी आगार प्रमुख राजेंद्र अहिरे म्हणाले की, म.रा.मा.प. महामंडळ धुळे यांनी 2017 या वर्षात विविध सवलती एस.टी महामंडळाला दिल्या आहेत.

त्यात विद्यार्थीनींसाठी प्रवास भाडयातील सवलती 100 टक्के आहे. त्यात अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इ.5 वी ते 10 वीपर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यायार्थी मासिक पास (शैक्षणिक) 66.67 टक्के, धंदे व शिक्षण व्यवसाय घेणारे विद्यार्थी (व्होकेशनल) 66.67 टक्के, विद्यार्थ्याना मोठया सुट्टीत घरी येणे-जाणे, परीक्षेला जाणे/येणेसाठी, शैक्षणिक कँम्पला जाणेसाठी, आजारी आई वडीलांना भेटण्यास जाण्या-येण्यासाठी सवलत, स्वत: आजारी असल्यास व शैक्षणिक सहलीसाठी देण्यात आलेले नैमित्तिक करार 50 टक्के तसेच विद्यार्थ्यांना जेवणाचे डबेसाठी 33 टक्के व राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या व शैक्षणिक स्पर्धा 50 टक्के, मुंबई पुनर्वसन केंद्रातुन मानसिकदृष्टया अपंग विद्यार्थ्यांसाठी व रेस्क्यु होममधील मुलांना वर्षातून एकदा सहलीसाठी 50 टक्के तसेच 65 वर्षावरील जेष्ठ नागरीक 50टक्के, आजारासंबंधी, क्षयरोगी, कर्करोगी, कुष्ठरोगी, अंध-अपंगांसाठी 75 टक्के तसेच अंपगांबरोबर मदनीस, अधिस्विकृती धारक पत्रकार व छायाचित्रकार, स्वातंत्र्य सैनिक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्रपुरस्कार्थी, आदिवासी सेवक पुरस्कार्थी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, शिवछत्रपती दादोजी कोंडदेव/द्रोणाचार्य मानव विकास यांच्यासाठी 100 टक्के, त्रैमासिक पास साठी 50 दिवसाचे भाडे भरुन 90 दिवसासाठी मोफ्त प्रवास सवलत, तसेच मासिक पास ज्यात 20 दिवसाचे भाडे आकारुन 30 दिवसाचा मोफत प्रवास सवलत दिली जाते. यामुळे सहजासहजी एस.टी.बसने प्रवास करा, अवैद्य वाहनात प्रवास करु नका.

या सर्व सलवली फक्त एस.टी महामंडळ देणार आहे. 15 ऑगस्ट ग्रामसभेत सुध्दा एस.टी.ची या सर्व सवलतीची माहीती दया, अशी सविस्तर माहीती दिली.

यानंतर लेखाकार बी.एन. बाविस्कर म्हणाले की, एस.टी.च्या या सवलती सर्व आदिवासी बांधवानी घेतली पाहीजे. तसेच गावातील नागरीकांनाही सांगितले पाहीजे. या सर्व सवलती महाराष्ट्र राज्यासाठी असल्याचे सांगितले.

यानंतर सहायक कार्यशाळा अधिक्षक वाय.एस. शिवदे म्हणाले की, मेकॅनीककडुन रोज एस.टी. बस मशनरीची पाहणी होत असते, आगार विभागामध्ये सर्व एस.टी. बस आल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुतली जाते.

असे सांगुन त्यांनी मेकॅनीक विभागाची संपुर्ण माहीती दिली. नंतर रायपुर गावाचे सरपंच ईश्वर गावीत म्हणाले की, एस.टी. महामंडळाने नविन चांगल्या बसेसची मांगणी केली पाहीजे.

तसेच चालक व वाहक यांनी प्रवासी यांच्याशी चांगला संवाद रोज साधला पाहीजे.तसेच लांब पल्ल्याचा बसेस या सर्व नवीन दिल्या पाहीजे, असे सांगितले.

यानंतर पागराणचे सरपंच सुरज गावीत, बोकलझरचे सरपंच राहुल गावीत तसेच वाहतुक नियंत्रक व्ही.एम. गावीत यांनी एस.टी. सदर्भात कवीता सादर करुन आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.ए. पवार यांनी केले तर आभार एस.टी. कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष संजय शिंदे यांनी मानले. या कार्याशाळेत उपस्थित सरपंचांना सवलती बाबतचे परीपत्रक वाटप करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*