5 ते 20 सप्टेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहिम

0
नंदुरबार । दि.11 । प्रतिनिधी-जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातंर्गत दि. 5 ते 20 सप्टेंबर कालावधीत कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येणार असून,
सदरहू कालावधीत पल्स पोलीओ कार्यक्रमाच्या धर्तीवर जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये आशा व आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून कुष्ठरोग सर्व्हेक्षण करणार असून दि.10 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय सभा घेण्यात आली व सभेमध्ये कुष्ठरोग शोध अभियानाबाबत कृती आराखडा व करावयाची कारवाई याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सभेसाठी माता, बाल संगोपन अधिकारी डॉ.हर्षल लांडे, सहाय्यक संचालक डॉ.के.झेड. चौधरी, वैद्यक्ीय अधिकारी डॉ.प्रिती पटले, जिल्हा हिवताप अधिकारी अर.बी. ढोले आदी विभागप्रमुख उपस्थित होते.

सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. के.झेड. चौधरी यांनी आवाहन केले की, कर्मचार्‍यांकडून कुष्ठरोबाबत तपासणी करून घ्यावी, कुष्ठरोगाबाबत लक्षणे आढळल्यास जवळच्या सरकारी दवाखान्यात तपासून घ्या, कुष्ठरोगाची तपासणी व उपचार सर्व सरकारी दखान्यामध्ये मोफत उपलब्ध आहे, कुष्ठरोग औषधउपचाराने बरा होतो.

 

 

LEAVE A REPLY

*