म्हसावद गावात चोरांचा धुमाकूळ

0

म्हसावद ता. शहादा । वार्ताहर-गावात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवडयात रात्री तीन दुकाने फोडण्यात आली तर दुसर्‍या रात्री पाच मोटरसायकली चोरीस गेल्याची घटना घडली.

चार मोटरसायकली म्हसावद गावाबाहेर ठिकठिकाणी नुकसान करून फेकलेल्या आढळून आल्या. या घटनांमुळे म्हसावद ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पोलीस प्रशासन मात्र सुस्त आहे.

गेल्या आठवडयात गुरूवारी रात्री राणीपूर फाट्यावर असलेले संतोष दत्तू महानुभाव यांच्या पंचकृष्ण रेस्टॉरंटच्या पत्र्याचे शेड उचकवून चोरटयांनी गल्ल्यातील 800 ते 900 रुपयांची चिल्लर, चिवडा, कुरकुरे, कोल्ड्रिंक्स लंपास करून दोन सीसीटीव्ही कॅमेरे फोडून नुकसान केले.

जवळच असलेल्या निलेश गोकुळ पुजारी यांच्या कृष्णा कोल्ड्रींक्स दुकानात प्रवेश करून कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या लंपास करून नुकसान केले.

रफीक नबू मन्सुरी यांचे मुस्कान मोबाईलचे दुकान फोडून पाच ते सहा मोबाईल लंपास केले. त्यांचे 28 हजार रुपयांचे नुकसान झाले.

दुसर्‍या दिवशी शुक्रवारी माणक रामदास पाटील यांची मोटरसायकल (क्र.एम.एच.39, एल.8296) अनकवाडा पुलाजवळ नुकसान करून फेकलेली आढळली.

योगेश केसरीमल बेदमुथा यांची मोटरसायकल (क्र.जी.जे. 21, 5303) पाण्याच्या टाकीजवळ, सरफराज शेख जहांगीर तेली यांची मोटरसायकल (क्र.एम.एच.39, एक्स 2493) कन्हेरी नदीच्या पात्रात तर तुमडू रामदास पाटील यांची मोटरसायकल (क्र.एम.एच.39, आर.-9464 ही जुन्या शहादा रस्त्यावर शेतात फेकलेली आढळून आली.

एकनाथ बाबूराव सांगळे यांची मोटरसायकल (क्र.एम.एच.18, सी.-1505) चोरांनी लंपास केली. चोरांनी मोटरसायकली वेगवेगळ्या रस्त्याला नुकसान करून फेकल्याबाबत म्हसावद पोलीसांत तक्रार देण्यात आला आहे.

काहींनी अजून तक्रार दिलेली नाही. म्हसावद गावात दोन महिन्यांपासून चोरीच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून सुस्त झालेल्या म्हसावद पोलीसांबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

*