विविध शाळा व संस्थांतर्फे विश्व आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

0
नंदुरबार । दि.11 । प्रतिनिधी-तालुक्यातील वाघाळे येथील नवजीवन विद्यालयात विश्व आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
प्रथम क्रांतीवीर बिरसा मुंडा, खाज्या नाईक, तंटया भिल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर क्रांतीवीरांच्या वेशभुषेत गावात मिरवणूक काढण्यात आली.

त्यानंतर पी.जी. मावची व सी.एस. पवार यांनी क्रांतीवीरांच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक पुष्पेंद्र रघुवंशी, अ‍ॅड. प्रकाश गांगुर्डे गावातील नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौतम पिंपळे यांनी केले तर आभार एच.ए. पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सी.एस. परदेशी, आर.एन. जावरे, एस.के. रघुवंशी, श्ररमती एल.एस. गांगुर्डे, पी.एस. खेडकर, डी.एस. खंदारे, सौ.व्ही.एम. पाटील, ए.एम. चौधरी, एस.एम. गावीत, डी.के. पाटील, ए.डी. नाईक, अमित मराठे, के.एस. पवार, बी.पी. चौरे, बी.डी. पाटील, एस.एस. खैरनार यांनी परिश्रम घेतले.
जी.टी.पाटील महाविद्यालय

नंदुरबार- येथील जी.टी.पाटील महाविद्यालयात सांस्कृती मंडळाच्या वतीने विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या सुरूवातील मनोज रघुवंशी यांच्या हस्ते आदिवासी क्रांतीकारकांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. रॅलीची सुरूवात हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. यावेही बी.के. पाटील, नगरसेवक कुणाल वसावे, प्राचार्य डॉ.व्ही.एस. श्रीवास्तव, उपप्राचार्य डॉ.एम.जे. रघुवंशी, उपप्राचार्य आर.आर. कासार आदी उपस्थित होते. या रॅलीत आदिवासी नृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. सदर रॅली उपप्राचार्य प्रा.ए.के. शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संयोजन समितीचे प्रा.प्रकाश ठाकरे, प्रा.मनोज शेवाळे, प्रा.दिपक गावीत, प्रा.सी.के. गिरासे व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, विार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

मो.क. रघुवंशी प्राथमिक विद्या मंदिर
विश्व आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनोज गायकवाड होते. आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. शाळेतील विद्यार्थी आदिवासी वेषभुषेत आले होते. विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. विविध आदिवासी गीते व आदिवासी नृत्य सादर केले. मुख्याध्यापक गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना आदिवासींचा इतिहास सांगितला. कार्यक्रमाचे संयोजन वैशाली पाडवी, वसुमती मोरे, अनिल शेख, शुभांगी माळी, यशवंत बोरसे, राहुल झाल्टे, दिनकर सावळे, अनिता गायकवाड, अनिता माळी यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*