दुष्काळ निधीत तीन कोटीचा घोटाळा : तळोदा प्रांताधिकारी कांबळे यांना अटक

0
नंदुरबार । दि.10 । प्रतिनिधी-खटावचे तत्कालीन तहसीलदार व सध्याचे नंदुरबार जिल्ह्याचे तळोद्याचे प्रांताधिकारी अमोल कांबळे (वय 31) रा.उत्सानाबाद यांना वडूज पोलीसांनी सातारा येथून अटक केली. त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे समजते.
खटाव तालुक्यातील 2015-16 साली आलेल्या दुष्काळ निधीत घोटाळा केल्याचा आरोपावरून अमोल कांबळे यांच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दि.5 रोजी फिर्याद दाखल केली होती.

विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिलेल्या आदेशानुसार डॉ.कांबळे यांनी 2 कोटी 93 लाख 10 हजार 858 रुपयांचा घोटाळा केल्याचे अहवालात नमूद केले होते.

कांबळे यांना अटक व्हावी, यासाठी जनता क्रांती दलाचे वडूजमध्ये धरणे आंदोलन सुरू होते. कांबळे हे अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सातार्‍यातील एका वकिलांकडे येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.

त्यानुसार पोलीसांनी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सापळा लावून त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना वडूज उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यालयात आणण्यात आले.

त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. श्री.कांबळे हे सध्या तळोदा येथे प्रांताधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*