शहादा । दि.10 । ता.प्र.-आदिवासी समाज ढोल-मापन यापासून दूर होत डी.जे.कडे वळत आहे. त्यामुळे आपण संस्कृती विसरत चाललो की काय अशी शंका येत आहे, असे प्रतिपादन माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनी केले.
विश्व आदिवासी विचार मंथन दिवसानिमित्त पटेल रेसिडेन्सी समोरील अन्नपूर्णा लॉन येथे आयोजीत कार्यक्रमात अ‍ॅड.वळवी बोलत होते.
यावेळी कवि वहारू सोनवणे, नामदेव पटले, सुनिल सुळे, राजेंद्र गावीत, मोहन शेवाळे, दामू ठाकरे, इंजि.जेलसिंग पावरा, भूरा पावरा, अ‍ॅड.चंपालाल भंडारी, प्रा.सखाराम मोते, अविनाश मुसळदे, संजय भामरे, शांताराम खर्डे, रविंद्र ठाकरे, जयसिंग जाधव, वनिता पटले, मनोहर खर्डे, नितीन ठाकरे, दामू ठाकरे, गौतम पटेल, अनिल निकुम, दंगल सोनवणे, ईश्वर पाटील, अनिल कुवर, माणक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी पुढे म्हणाले, आदिवासी संस्कृती, समाजाचा विकास झाला पाहिजे. तिचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. आदिवासी समाज जागृत झाला हा पुरावा देण्याची आवश्यकता नाही.

आदिवासी समाज ढोल-मापन यापासून दूर होत डी.जे. कडे वळत आहे. त्यामुळे आपण संस्कृती विसरत चाललो की अशी शंका येत आहे.

काही बोगस आदिवासी खोटे आदिवासी जातीचे वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून नोकरी, राजकारणात, शिक्षणात त्याचा दूरूपयोग करीत आहेत.

तलवार-धारेची लढाईपेक्षा न्यायालयाची लढाई आपण जातीसाठी जिंकलो आहे. संस्कृती-एकता-संघटन बरोबर समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे,असेही ते म्हणाले.

राजेंद्र गावीत यांनी सांगितले, समाजासाठी विरपुरूष शहीद-क्रातिवीर झाले आहेत. त्यांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही, अशी शपथ समाजबांधवांनी घ्यावी. समाजाचे संरक्षण, शिक्षण, विकासासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे.

राजकीय पक्ष सामाजिक संघटना वेगवेगळ्या असल्या तरी समाजाच्या प्रश्नाच्यावेळीस सर्व मतभेद बाजूला सारून समाजासाठी काम करावे.

कवि वाहरू सोनवणे म्हणाले की, आदिवासी हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे हा मानवाचा हक्क आहे. आदिवासींच्या जीवनाचे-संस्कृतीचे संरक्षण झाले पाहिजे.

आदिवासी संस्कृती विश्वासावर आहे. त्याच आधारावर जीवन जगणारे आहेत. आम्हाला ढोल वाद्य वाजविण्यास पैसे लागत नाही. मात्र या संस्कृतीची जपणूक करण्यासाठी सर्व समाजाने एकत्र व्हावे.

आपली संस्कृती प्रेम-आनंद देणारी असल्याचे वाहरू सोनवणे यांनी सांगितले. कवि वाहरू सोनवणे, झेलसिंग पावरा, दामू ठाकरे, वनिता पटले यांनी नई भूलजी धरती याहाकीला या गिताने सुरूवात केली.

प्रा.बन्सीलाल भामरे यांनी सांगितले, आदिवासी समाजाच्या संस्कृती-शिक्षण-पारंपारिक विषयाबाबत जनजागृतीसाठी 34 वर्षाअगोदर बीजे रोवली गेले.

1992 ला 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी समाजाच्या चर्चाबाबत बिज रोवली गेली आहे. आदिवासी समाजाने हक्कासाठी एकत्र झाले पाहिजे. आदिवासी समाजाची व्यक्ती भूक-शिक्षणापासून वंचित राहू नये असा अजेंडा यूनोने 2020 पर्यंत तयार केला आहे.

सातपुडा पावरा समाज सेवा संघाचे रविंद्र आर्य यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीने समाजसेवकाची भूमिका बजवावी. युवकांना दिशा देण्याची नेतृत्वाची गरज आहे.

जनजागृती व्याख्यानाचा माध्यमातून समाजाला जागृत केले पाहिजे. आदिवासी समाज पुढारलेला आहे असे फक्त वरच्यावर आहे.

समाजातील एखाद-दुसरा टक्का व्यक्ती आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकारी झालेला नाही ही खंत आहे. आजच्या युवकांना क्रांती घडविण्याचे असेल तर शेर-टायगर यांचे मुखवट्यापेक्षा शिक्षण क्रांती घडवा.

एकलव्य भिल समाज संघटना संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे (श्रीरामपूर) यांनी सांगितले की, शिक्षण, समाज सुधारणा, अज्ञानपण, अंधश्रद्धा यावर समाजात विचार मंथन झाले पाहिजे. सर्व समाज सेवा संघटनांनी एकत्र येवून विचार मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

यावेळी आदिवासी समाजातील युवक युवतींनी समाजाची विविध गाणी-नृत्य सादर केली. विविध नृत्यकला पथकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आली.

आदिवासी संस्कृतीचे विविध धार्मिक-कौटुंबिक गाणे सादर केली. यावेळी परिसरातील आदिवासी समाजाने लिखान केलेले विविध साहित्य पुस्तकांची विक्री स्टॉल मांडलेले होते.

विश्व आदिवासी दिवसानिमित्त विचार मंथनाच्या एकूण 16 ठराव मांडून पारीत करण्यात आला. यात अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्र आधारे नोकरीत लागलेल्या किंवा संस्थेत प्रवेश मिळविलेल्या व ज्याचीवैधता समितीने अवैध ठरविलेले बोगस व्यक्तीवर कार्यवाही करावी.

नंदुरबार जिल्ह्यात मजूरांसाठी रोजगार निर्मिती करून मजूरीसाठी स्थलांतर रोखणे, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी रिक्त पदाबाबत यासह 16 ठराव वाचन करून त्यावर शासनाने निर्णय घेण्याचे यावेळी नामदेव पटेल यांनी ठरावा वाचतांना केले आहे.

कॉ.मोहन शेवाळे यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.अशोक वळवी, छोटूलाल खर्डे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदिवासी एकता परिषद पावरा उन्नती मंडळ, आदिवासी शिक्षक संघटना आदिवासी कर्मचारी संघटना, आदिवासी विद्यार्थी संघटना, आदिवासी ग्रामसेवक संघटना, एकलव्य भिल समाज संघटना, अखिल भारतीय आदिवासी पावरा बारेला संघटना, सातपुडा पावरा समाज संवा संघ, आदिवासी कृषी संघ, भिल्लीस्थान टायगर सेना यासह विविध संघटनांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. आभार प्रदर्शन प्रा.अशोक वळवी यांनी केले.

कोठार आश्रमशाळेतही विविध कार्यक्रम
मोदलपाडा । वार्ताहर- श्री साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपुर संचलित अनंत ज्ञानदीप आश्रमशाळा कोठार येते जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.

सुरुवातीला पारंपरिक पेहराव करून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासींची कुलदैवत देवमोगरा मातेचे व विविध क्रांतिकारकांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील प्रतिष्टीत नागरिक वासुदेव पाडवी तर प्रमुख पाहुणे प्राथमिक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील हे उपस्थित होते.

यावेळी शाळेतील विद्यार्थी नागेश पावरा, कुवरसिंग पाडवी, दारासिंग वळवी आदी विद्यार्थ्यांनी क्रांतिकारी बिरसा मुंडा, राणा पुंज्या भिल यांच्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली.

यावेळी शाळेतील शिक्षक मांगीलाल भदाणे यांनी प्राचीन काळापासून आदिवासी समाजाची परंपरा याबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

थोर धनुर्धारी एकलव्य यांच्याबद्दल इतिहास सांगितला. माध्यमिक शिक्षक पन्नालाल पावरा यांनी आदिवासींचा इतिहास उजागर करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

तसेच हल्दी घाटीमध्ये राणा पुंज्या भिल याने कसे शौर्य गाजवले, याबद्दल माहिती सांगितली. माध्यमिक शिक्षक जितेंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त करतांना जागतिक आदिवासी दिनाची राष्ट्र संघाने कशी मान्यता दिली, त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

आधुनिक समाज निर्माण करून डिजिटल इंडिया बनवायचं आहे, अशी जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. यावेळी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी प्रतिज्ञा सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी घेतली. आदिवासी राष्ट्रगाण म्हणण्यात आले. विविध क्रीडा स्पर्धा यानिमित्ताने घेण्यात आल्या. सूत्रसंचलन जयवंत मराठे यांनी केले. आभार प्रदर्शन भाऊसाहेब कुवर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक पन्नालाल पावरा, जितेंद्र चौधरी, दीपक मालपुरे, मनोज चिंचोले, योगेश चव्हाण, गोविंद पाटील, शालीग्राम वाणी, जयेश कोळी, पंकज नरसिंगे तसेच सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बोरद येथे 40 गावातील आदिवासी बांधव उपस्थित
बोरद। वार्ताहर – बोरद येथे आज आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचतर्फे मोठ्या उत्साहाने विश्व आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी चौकात बिरसा मुंडा या प्रतिमेचे अनावरण करून उदघाटन करण्यात आले.

सकाळी 8 वाजेपासून बोरद गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. बोरद परिसरात, तुळजे, करडे, मालदा, न्युबन, जुवानी, छोटा धनपूर, लाखापूर, गोंडाने, मोहिदा, मोड, खरवड, ध्वजा पाणी, कडमसरे, तर्‍हावद गुंजाळी, उमरी, धानोरासह चाळीस गावातील आदिवासी बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

सकाळी 10 वाजेपासून ढोल, ताश्यासह आदिवासी पारंपरिक वाद्यावर, पारंपरिक पोषाख करून नृत्य सादर करत गावभर मिरवणूक काढण्यात आली.

बोरद चौफुलीवर बिरसामुंडा यांच्या प्रतिमेचे अनावरण कॉ.जयसिंग माळी, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच महाराष्ट्राचे राज्य सचिव सुनील धानका व जिल्हाध्यक्ष कॉ.दयानंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

चौकाचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी माजी जि. प.सदस्य कॉ.तापीबाई माळी, कॉ.इंदिराबाई चव्हाण, राजू चव्हाण, कॉ.मंगलसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.

कॉ.जयसिंग माळी, सखुबाई वळवी, मंगलसिंग चव्हाण, इंदिराबाई चव्हाण, कॉ.कुमार शिराडकर, सुनील धानका यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना सुनिल धानका व कॉ.जयसिंग माळी म्हणाले की आदिवासी समाज संघटित करण्यासाठी अनेक वर्षांपासून आदिवासी दिन साजरा करण्यासाठी मागणी होती.

आदिवासी मानव अधिकार 9 ऑगस्ट 1993 च्या संयुक्त राष्ट्र संघाचा आम सभेत मंजूर करण्यात आले. तेव्हापासून 9 ऑगस्ट हा दिवस विश्व आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे.

9 ऑगस्टला जिल्ह्याच्या ठिकाणी जाता येणार नाही म्हणून एक दिवस अगोदर म्हणजे 8 ऑगस्ट रोजी बोरद परिसरातील आदिवासीचे अधिकार राष्ट्रीय मंचतर्फे आदिवासी दिन साजरा करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

आभार जिल्हाध्यक्ष कॉ.दयानंद चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुणाल पाडवी, संजय ठाकरे, प्रवीण ठाकरे, दिलवर खर्डे, सुनील पाडवी, बहादूर ठाकरे, अंजु पाडवी आदींनी परिश्रम घेतले.

दरम्यान, माध्यमिक विद्यालय, तळवे ता.तळोदा येथे आयोजित विश्व आदिवासी दिवस व ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक निमेश सुर्यवंशी अध्यक्षस्थानी होते.

त्यांच्या हस्ते याहामोगी मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. वरीष्ठ शिक्षक रमाकांत चौधरी यांनी क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

प्रास्ताविक रामकुमार सुर्यवंशी यांनी केले. गजेंद्र गोसावी यांनी क्रांतीकारी बिरसा मुंडा यांनी केलेल्या इंग्रजांनविरूध्द कार्याची माहिती दिली.

याप्रसंगी बोलताना आप की जय विषयी गुलाम बाबा, तंट्या भील, खाज्या नाईक यांच्याविषयी प्रकाश टाकला. यावेळी असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेच्या शिक्षक वृंद व्ही.डी.मराठे, डी.एम.मराठे, श्रीमती आर.जे.माळी, ए.पी.टवाळे, आयु.अनिलकुमार इंदीस, एस.जी.तनपुरे, आकाश महाजन उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचारी अनिल माळी, महेंद्र सुर्यवंशी, गजानन माळी, धनराज केदार यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*