तळोदा परिसरात ऊसावर पांढर्‍या माशीच्या प्रादुर्भाव

0
बोरद ता. तळोदा । दि.10। वार्ताहर-तळोदा तालुका परिसरात ऊसावर पांढरी माशीच्या प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांच्या चिंता वाढल्या आहेत.
नुकतेच तालुक्यात अनेक शिवारात कृषी चिकित्सालय पथक कृषी महाविद्यालयाचे कीटक शास्त्रज्ञ भालचंद्र म्हस्के यांनी उसाच्या क्षेत्राची पहाणी करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन व पांढरी माशी नियंत्रणे, संभाव्य उपाय व नियंत्रणासाठी औषध फवारणी माहिती देण्यात आली.

तळोदा तालुक्यात उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आलेली आहे. ऊसावर पांढरी माशीच्या प्रादुर्भाव झल्याने उसाची पाने लालसर तांबट, काळसट, पिवळे पडत आहे.

यामूळे ऊस उत्पादक शेतकरी विवंचनेत पडला आहे. त्यातच उपाय योजना करण्यासाठी संततधार पावसामुळे व्यत्यय येत आहे शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे कळविले.

त्यानुसार कृषी अधिकार्‍यांनी कृषी महाविद्यालय धुळे कीटक शास्त्रज्ञ भालचंद्र म्हस्के यांच्यासह तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर, मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक जी.आर.पाटील, ए.एस.पाटील, कृषी सहाय्यक गणेश कदम व कृषी विभागाचे कर्मचारी यांनी अनेक ठिकाणी ऊस क्षेत्रास भेट दिली.

तळोदा तालुक्यात खरवड येथे उसाची पाहणी केली. ग्राम पंचायत कार्यालयात शेतकर्‍यांना पिकांवरील उपाय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी नंदुगिर गोसावी, सुनील गोसावी, बबन भारती, विजय मराठे, भटू मराठे, संदीप गोसावी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

तळोदा, प्रतापपूर, रांझणी, नवागांव शिवारात ऊस क्षेत्रांची पहाणी केली, उसा पिकातील पांढरी माशी माहिती व नियंत्रण संदर्भात औषध फवारणी करणे व उपाययोजना करण्याकामी मार्गदर्शन केले. शेतकर्‍यांनी विचारले समस्या व प्रश्नांना सविस्तर मार्गदर्शन करून समाधान केले.

यावेळी जितू देसाई, कमलेश देसाई, केतन देसाई, दिनेश देसाई, भारत गिरासे, सदाशिव पाटील, छात्रसिंग राजपूत, आदींसह शेतकरी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*