बाल गुन्हेगारांच्या शिक्षेसाठी वयोमर्यादा कमी करावी

0

नंदुरबार । दि.09 । प्रतिनिधी-बाल गुन्हेगारांच्या बाबतीत गुन्ह्याच्या शिक्षेसाठी वयोमर्यादा 18 वरून 16 पर्यंत आणावी. या मागणीसाठी प्रवासी संघटनेचे पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठीत सामाजिक कार्यकर्त्यांनी हाटदरवाजा येथील महात्मा गांधी पुतळयासमोर सकाळी 11 वाजता मौन बाळगून धरणे आंदोलन केले.

येथील डी.आर.हायस्कुलच्या शिकणारा विद्यार्थी राज ठाकरे याच्या निर्घृणपणे हत्या बालगुन्हेगाराकडूनच घडली. मात्र 18 वर्षाच्या वर असलेल्यांना शिक्षा होवू शकते.

असे नमूद करण्यात आले आहे. हे चुकीचे असून यापुढे अशी घटना घडू नये, यासाठी हा कायदा रद्द करून 16 वर्षाचा वयाचा कायदा करावा. त्याने केलेला अपराध हा बघावा, त्याचे वय नव्हे.

अशा चुकीच्या कायद्यांमुळे देशात गुन्हेगारीत वाढ होत आहे. यापुढे देखील देखील गुन्ह्यांचे प्रमाण शहरात वाढत जाईल. म्हणून हा कायदा बदल करणे आवश्यक आहे.

सध्याच्या काळात मुलांच्या मेंदूत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 11 वर्षाचा मुलगा देशाला प्रबोधन करतो. व्याख्याने देतो अथवा टीव्ही, सिरिअलमध्ये मोठमोठे कार्यक्रम तयार करतो.

यावरून आजच्या मुलांच्या मेंदूत मोठया प्रमाणात बौध्दीक विकास झालेला आहे. पुर्वीच्या मुलांना भवर्‍याला दोरी गुंडाळता येत नव्हती. मात्र आजच्या युवक इंटरनेटशी जोडला गेला आहे.

या देशात ज्ञानेश्वरी 16 व्या वर्षी लिहिली जाते. शिरीषकुमार इंग्रजांच्या विरोधात कोवळया वयात लढले. असे विविध दाखले मुलांमधील विकसीत झालेले दिसून येतात.

म्हणून कायद्यात बदल होणे आवश्यक आहे. भारतीय संविधानानुसार 15 अथवा 16 वर्षाच्या मुलाने केलेला अपराध ग्राह्य धरावा अशी मागणी मौन धरणे आंदोलनाच्या दिवशी करण्यात आली.

LEAVE A REPLY

*