रनाळेखुर्द ग्रा.पं.तील घोटाळ्यातील चौकशी करावी

0

नंदुरबार । दि.07 । प्रतिनिधी-नंदुरबार तालुक्यातील रनाळे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराची चौकशी करावी असे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी जि.प. उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) यांना दिले आहे.

याबाबत रनाळे खुर्द येथील ग्रा.पं. सदस्य तुळशिरामस रूस्तम गावीत व अन्य दोन सदस्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता.

या तक्रार अर्जात रनाळे खुर्द ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक मनमानी कारभार करत असल्याचे व ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात घोटाळा करीत असल्याचे नमूद करण्यात आले होते.

ग्रामसेवक व सरपंच यांनी ग्रामसभेतील कोणतेही रजिष्टर न आणता तोंडी व्यवहार सांगितलेा. तसेच गा्रमस्थांनी काही प्रश्न उपस्थित केले असता.

उडवा उडवी उडवीचे उत्तरे दिली. सदस्य नसतांना त्यांचे नांव टाकून बँक खाते उघडण्यात आले. तसेच बोहरवेल, गटार लाईन, शौचालय व इतर कामांसाठी निधी आलेला असतांना त्याचा गैरवापर केल्याचे चौकशीत आढळून आलेत्र म्हणून या प्रकाराची त्वरीत चौकशी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात यावी व त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास द्यावा असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दि. 12 जून 2017 रोजी याबाबत एक तक्रार अर्ज ग्रा.पं. सदस्य रूस्तम तुलशिदास गावीत यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे दिलेला होता.

त्यामध्ये ग्रामसेविका एस.व्ही. नाईक व सरपंच संगिताबाई कोकणी यांनी मनमानी कारभार करून ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात घोटाळा केल्याचे नमूद केले.

त्यानुसार सन 2016-17 या आर्थिक वर्षात चार लाख 49 हजार 366 रूपये अनुदान प्राप्त झाले असतांना केवळ 22 हजार 384 रूपये खर्च करण्यात आले.

तर सन 2017- 18 मध्ये एकूण 65 हजार 440 रूपये अनुदान प्राप्त असतांना अंगणवाडी साहित्य खरेदी, शाळा विद्युत फिटींग, पीव्हीसी बंदीस्त गटार यासाठी दीड लाख रूपये खर्च करण्यात आले.

5 टक्के पेसा अबंध निधीतून सन 2016-17 मध्ये 5 लाख 81 हजार 74 रूपये अनुदान प्राप्त झाले. त्यातून 24 हजार 400 रूपयाची कामे करण्यात आली तर 2017-18 अनुदान नसतांना सुमारे पावणे तीन लाखाची कामे करण्यात आली.

ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत 2016-17 अंतर्गत 3 लाख 10 हजार 490 रूपये अनुदान मिळाले. त्यातून 0 टक्के खर्च झालेला असतांना काम पूर्ण दाखविण्यात आले.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 2016-17 मध्ये 8 लाख 64 हजार रूपये अनुदान प्राप्त झाले असतांना 72 शौचालयांसाठी संपूर्ण रक्कम खर्च करण्यात आली.

परंतु याबाबत झालेल्या आर्थिक व्यवहारामध्ये दि.30 जून रोजी दोंडाईचा येथील स्वामी लिला शाह यांना पाईप खरेदीसाठी 78 हजार 900 रूपयांचा धनादेश देण्यात आला. परंतु अद्याप साहित्य प्राप्त झालेले नाही.

तसेच पेसा अबंध निधीतील साहित्य खरेदीसाठी संबंधित दुकानदारास रक्कमा देण्यात आलेल्या असूनही जीएसटीमुळे व्यापार्‍यांनी मालपुरवठा केलेला नाही.

त्यामुळे याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. तत्कालीन ग्रामसेविका संगिता पाटील यांनी दप्तर विद्यमान ग्रामसेवकांकडे सुपूर्त केलेले नाही.

या सर्व गोष्टींची चौकशी व्हावी, यासाठी निवेदन देण्यात आले असून त्याची दखल घेवून निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकार्‍यांना सखोल चौकशी करणारे पत्र दिले आहे.

 

LEAVE A REPLY

*