नंदुरबार । प्रतिनिधी-भारतातील आदिवासींच्या अस्तित्वाचा विचार करता ज्या पध्दतीने आदिवासींच्या जीवनमुल्यांवर आघात केले जात आहे.
या एकूणच सर्व बाबींचा विचार केला तर आदिवासींचे अस्तित्व नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला असून वेळीस धोका ओळखणे आवश्यक असल्याचे मत आदिवासी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश वळवी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.

धानोरा ग्रामनागरीक सत्कार समिती व मुळनिवासी मुक्तीमंच आयोजित निवृत्त कर्मचारी, विद्यार्थी गुणगौरव व विश्व आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ.यमुना वळवी, प्रा.भिमसिंग वळवी, डॉ.नरेश पाउवी, तानाजी वसावे, मगन वळवी, परबत नाईक आदी उपस्थित होते.

डॉ.वळवी यांनी आपल्या अस्तित्वासाठी पंरपरागत चालत असलेलया रूढी परंपरा टिकविणे आवश्यक असून आज देशातील शासनकर्ती जमात आपल्या अस्तित्वासाठीची ओळख नष्ट करण्यासाठी नियोजन पध्दतीने काम करीत आहे.

याकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष देणे आवश्यक असून भविष्यातील आरोग्यविषयक समसयाही समजून त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती अध्यक्ष कुवरसिंग वळवी यांनी तर आभार सुनिल वळवी यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रभाकर वळवी, अजु्रन वसावे, शरद वळवी, मानसिंग वसावे, तापसिंग वळवी, विलास पाडवी, भानुदास वसावे, महेश वसावे, विलास वळवी, अश्विन वसावे, विक्रम पवार, बाळासाहेब पवार, मगन नाईक, गुलाबसिंग नाईक आदींनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*