दरा प्रकल्पाचे पाणी वाकी नदीत सोडले

0
शहादा / तालुक्यातील वाकी नदीवरील दरा मध्यम प्रकल्पातून अडवलेले पाणी नदीपात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लावून धरली होती.
या मागणीची जिल्हाधिकार्‍यांनी गांभीर्याने दखल घेत प्रकल्पातील पाणी वाकी नदीत सोडले.

जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या सूचनेप्रमाणे प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता शरद सोनवणे, शाखा अभियंता डी.एन.मोरे यांनी दरा प्रकल्पाचे पाणी वाकी नदीत सोडले.

याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी, उपजिल्हाध्यक्ष नथ्थू पाटील, तालुकाध्यक्ष वसंत पाटील, सरचिटणीस रविंद्र पाटील, परिवर्धे येथील शेतकरी भगवान चौधरी, भरत पाटील, हरीकृष्ण पाटील, बाबू पाटील, प्रकाश पाटील उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*