गुरू रविदास मैत्री संघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

0

नंदुरबार । प्रतिनिधी-गुरु रविदास नोकरदार मैत्री संघ आयोजित गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेवराव शेवाळे, मुख्यअतिथी आत्माराम मोरे (सुरत), से.नि.समाज कल्याण आयुक्त काशिनाथजी गवळे, डॉ.यतिन वाघ, डॉ. प्रिया अहिरे, प्रा.जे.जे. गंगाराम बागले (लोणखेडा), बापु शिरसाठ (सुरत), नरेन्द्र विसावे तसेच शिरपुर येथील महाले व संघटनेचे अध्यक्ष केशव राजभोज व संघटनेचे जेष्ठ प्रदेश संघटक शांतीलाल शिंदे, सुनिल गांगुर्डे, प्रा.चित्ते, खजिनदार मधुकर शेवाळे, एन एन अहिरे, विजय शेवाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व गुणवंतासह पालक वर्ग व मोठ्या प्रमाणात चर्मकार समाज बांधव उपस्थित होते.

या प्रसंगी चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या भाषणात राजपुत पेट्रोल पंप जवळील चौकास संत रविदासांचा नाम फलक लावण्याचे देखील जाहीर केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बलदेव वसईकर, नेरकर, अमोल कांबळे, प्रविण शिंदे, शिवाजी महाले, तसेच सहकार्य प्रल्हाद राजभोज, किशोर महाले, प्रवीण भामरे यांनी केले. सुभाष सावंत यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाचा समारोप केला.

 

LEAVE A REPLY

*