पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 10 मिनिटात 10 विषय मंंजूर

0
नंदुरबार । दि.05 । प्रतिनिधी-नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज छत्रपती शिवाजी नाटयमंदिरात पार पडली.या सभेत दहा विषय अवघ्या 10 मिनीटात मंजूर करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी उपस्थित होत्या.उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, मुख्याधिकारी गणेश गिरी, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका सभेस उपस्थित होते.
या सभेत विषय क्र. 1 मध्ये राजेंद्र नगरमधील मोकळया जागेत चेनलिंक फेनसिंग करणे व इतर 16 कामे करण्यासाठीे खर्चास कार्योत्तर मंजूरी देण्यात आली.

विषय क्र. 2 मध्ये विमल विहार जवळील व्यायाम शाळेच्या पहिल्या मजल्यावर योगा हॉलसाठी बांधकाम करण्यास कार्योत्तर मंजूरी देण्यात आली, विषय क्र. 3. वर्धमान नगरमधील बडगुजर यांचे घरापासून ते पुर्वेस नपा हद्दीत विमल हॉसिंग सोसायटी चौपाळे शिवारपर्यंत रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले, विषय क्र. 4 नुसार शासकीय कृषी महाविद्यालय नंदुरबार यांना मीटर पध्दतीने 90 मी.मी. व्यासाचे नळ कनेक्शन मंजूर केले, विषय क्र.5 मध्ये लालबाग कॉलनी अंतर्गत प्लाँ. नं. 6 ते 24 पावेतो व प्लॉ नं. 7 ते 11 पावेतो रस्ता रूंदीकरण करून डांबरीकरण करणे व इतर 3 काम करणेकामी विहित प्रक्रियेचा अवलंब करून निविदा मंजूर करण्यासाठी कार्योत्तर मंजूरी देणयात आली, विषय क्र. 6 प्रमाणे मराठा मंगल कार्यालय ते श्रीहरी निवास येथून बन्सी चौधरी यांचे घरापर्यंत रस्ता ट्रीमिक्स पध्दतीने कॉक्रीटीकरण करणे व इतर 2 कामे करण्यासाठी निविदा मंजूर करण्यास कार्योत्तर मंजूरी देण्यात आली, विषय क्र. 7 साक्रीनाका परिसरातील जुन्या पाण्याच्या टाकीपासून मेनरोड पावेतो रस्ता कॉक्रीटीकरण व इतर 4 कामे करणेकामी निविदा मंजूर करण्यास कार्योत्तर मंजूरी दिली, विषय क्र. 8 नुसार स.नं. 433 च्या जागेवरील व्यापारी संकुलास लिप्ट बसविणे व इतर 2 कामे करणेकामी निविदावर निर्णय घेण्यात आला, विषय क्र.9 प्रमाणे नंदुरबार शहर विकास योजनेमधील स.नं. 123 च्या जागेवरील क्र. 1 व 2 स्मशानभुमी व वनविभागासाठी आरक्षित दर्शविलेले क्षेत्र आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्याच्या ठरावास परिषद ठराव क्र. 173 व दि.15 फेब्रुवारी 2017 अन्वये घेतलेल्या निर्णयास अंतिम मंजूरी देण्यात आली.

विषय क्र. 10 नुसार नंदुरबार शहर विकास योजनेमधील स.नं. 80 शेती विभागात समाविष्ट असलेले क्षेत्र शेती विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ठ करण्याबाबत परिषद ठराव क्र. 174 दि. 15 फेब्रुवारी अन्वये घेतलेल्या निर्णयास अंतिम मंजूरी देण्यात आली. यावेळी सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*