नेमसुशिल विद्यालयातर्फे अनोखे रक्षाबंधन

0
चिनोदा ता.तळोदा । वर्ताहर-तळोदा येथील नेमसुशिल व श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिराने रक्षाबंधन हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
बहीण भावाचा पवित्र मानला जाणारा रक्षाबंधन हा सण नेमसुशिल व श्रीमोती विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी समाजापुढे एक नविन आदर्श ठेवून गरीब व श्रमिक लोकांच्या मुलांमध्ये जाऊन त्यांना राख्या वाटप करून रक्षाबंधन साजरा केला.
यात सदरच्या राख्या याच विद्यामंदिरातच कलाशिक्षिका श्रीमती प्रतिभा गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आल्या होत्या.

हल्ली बाजारात मिळणार्या महागड्या राख्या गोरगरीब जनतेला विकत घेणे जिकरीचे जाते. म्हणूनच हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नेमसुशिल व श्रीमोती विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्यात.

सदरच्या उपक्रमास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नेमसुशिल व श्रीमोती विद्यामंदिराचे तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या स्तुत्यपूर्ण उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री.निखीलकुमार तुरखिया, संचालिका सौ.सोनाबेन तुरखिया, उपाध्यक्ष श्री.डी.एम.महाले, सचिव श्री.संजयभाई पटेल, मुख्याध्यापिका श्रीमती पी.एच.बागुल, श्रीमोतीचे मुख्याध्यापक श्री.जी.बी.बेलेकर आदींनी कौतुक केले.

या कार्यक्रमास संदिप चौधरी, देवेंद्र चौधरी, अरूण कुवर, सागर मराठे, धनंजय कोळपकर, मुकुंदा महाजन, प्रतिभा गुरव, रूख्मिणी खर्डे, सागर सोजळ, संतोष पावरा, सचिन पाटील, राजेश मराठे, चंद्रकला कोळी, शैलेंद्र पाटील, योगेश शिंपी, समाधान मराठे, शहारूख पिंजारी, विष्णू चित्रकथे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ़या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*