जिल्ह्यात एक जण स्थानबद्ध ; 24 जणांवर हद्दपारीची कारवाई

0
 नंदुरबार । दि.4 । प्रतिनिधी-आगामी सण-उत्सव तसेच नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर एमपीडीए अधिनियमानुसार पंकज नामदेव चौधरी याला स्थानबद्ध करण्यात आले असून 24 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस प्रशासनातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आगामी सण व उत्सव तसेच नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्याचा दृष्टीने जिल्हा पोलीस दलातर्फे कठोर उपाय योजना करण्यात आली आहे.

मागील काही काळात नंदुरबार जिल्ह्यात विशेषतः नंदुरबार शहरात काही समाजकंटक लोकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून समाजिक वातावरण दुषीत केले.

त्याचा आढावा घेवून व मागील जातीय दंगलीचा आढावा घेवून त्या मागील व्यक्तीचा शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून एमपीडीए अधिनियम 1981 च्या कलम 3 (1) नुसार पंकज नामदेव चौधरी रा.साक्रीनाका नंदुरबार याला स्थानबध्द करण्यात आले आहे.

त्याचबरोबर नंदुरबार शहरातील अशा 24 व्यक्तीविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56/ 57 नुसार हद्दपारीची देखील कारवाई करण्यात आली आहे.

या व्यतिरीक्त संपूर्ण जिल्हा भरात देखील अशा प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या इसमांवर विविध कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.

यामध्ये महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार धोकदायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींची विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती, वाळु तस्कर, काळाबाजार करणार्‍या व्यक्ती आदी सर्वांचा समावेश आहे.

त्यापैकी पंकज नामदेव चौधरी याला दि. 3 ऑगस्टपासून जिल्हादंडाधिकारी यांच्या स्थानबध्द आदेशानुसार नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांनी दिली.

 

 

LEAVE A REPLY

*