भांग्रापाणी आश्रमशाळा समस्यांचे माहेरघर

0
नंदुरबार । दि.04 । प्रतिनिधी-भांग्रापाणी ता.अक्कलकुवा येथील आश्रमशाळेत विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या त्वरीत न सुटल्यास दि.11 ऑगस्ट रोजी धडगांव-मोलगी रस्त्यावर भांग्रापाणी येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी, पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भांग्रापाणी (ता.अक्कलकुवा) येथे शासकीय आश्रमशाळा सन 1980 पासून कार्यान्वित आहे.
या शासकीय आश्रमशाळेत जवळपास 350 ते 400 आदिवासी मुले मुली शिक्षण घेत आहेत. परंतु सदर आश्रमशाळेला चांगल्या दर्जेची इमारत बांधून देण्यात आली नाही.

परंतु आज अखेरपर्यंत नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भविष्यामध्ये जीवघेणी दुर्घना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्राचा आर्थिक धोरणानुसार आदिवासीच्या वाटयाला लोकसंख्येचा प्रमाणात आर्थिक तरतूद आहे. आश्रमशाळेतून शिक्षण घेणार्‍या आदिवासी मुलामुलींसाठी निवास व शाळेसाठी इमारत नाही.

अशासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेणार्‍या आदिवासी मुलामुलींसाठी निवास व शाळेसाठी इमारत नाही. शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेणार्‍या आदिवासी विद्यार्थीना शासनाने उघडयावर व वार्‍यावर सोडून दिले आहे.

त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. या आश्रमशाळेतील इमारत वीज, पाणी, शौचालय, जेवणाची सुविधा अपूर्ण शिक्षक वर्ग आणि दर्जेदार शिक्षण या मुलभूत सुविधा दिल्या जात नाही तसेच एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी आजपर्यंत कोणतीच दखल घेतली नाही आणि आश्रमशाळेची इमारत 5 ते 6 वर्षापासून बांधकाम सुरू आहे.

परंतु आजपर्यंत बांधकाम पूर्ण झालेले नाही आणि जे केले आहे ते निकृष्ट दर्जाचे बांधकाम असून याविषयी संबंधीत तात्कालीन व वर्तमान बांधकाम अधिकारी व ठेकदेार यांच्यावर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.

यासाठी दि.11 ऑगस्ट रोजी विद्यार्थी व पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने धडगांव ते मोलगी रस्त्यावर भांग्रापाणी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

निवेदनावर पं.स. सभापती बिज्या वसावे, माजी आरोग्य सभापती सी.के. पाडवी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुकाराम वसावे, काठी सरपंच पृथ्वीसिंग तडवी, इमाबाई तडवी, सुरपसिंग पाडवी, मोलगी सरपंच शितल पाडवी, आदिवासी एकता परिषदेचे जितेंद्र वळवी, जयवंताबाई पाडवी, बहादुरसिंग पाडवी, सोन्या वसावे, भरतसिंग तडवी, अ‍ॅड. सरदारसिंग वसावे, वाण्या वळवी, दिलवरसिंग पाडवी, धिरसिंग वसावे, जयसिंग वसावे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

 

 

 

LEAVE A REPLY

*