आराळे येथे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी : 21 जणांविरुद्ध गुन्हा

0
नंदुरबार । दि.04 । प्रतिनिधी-नंदुरबार तालुक्यातील आराळे येथे शेतीच्या वादावरून झालेल्या मागील भांडणातील कुरापत काढून दोन गटात हाणामारी झाली.
या हाणामारीत दोन्ही गटातील 21 जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या तिघांना अटक करण्यात आली आहे.
प्रमिलाबाई प्रकाश रामराजे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील भांडणाची कुरापत काढून तिला शानुबाई सिताराम राजराजे, सिताराम उखा रामराजे, रमेश सिताराम रामराजे, किशोर सिताराम रामराजे सर्व रा. आराळे (ता.नंदुरबार) या चौघांनी तिला मारहाण करून तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रमेश सिताराम रामराजे यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीनुसार, शेतीच्या वादातून शानुबाई सिताराम रामराजे हिला रविंद्र प्रकाश रामराजे, नितीन बापू रामराजे, प्रकाश डोंगर रामराजे, विजय भाईदास रामराजे, सुनिल रोहिदास रामराजे, प्रमिलाबाई प्रकाश रामराजे, बानुबाई बापू रामराजे, विमलबाई रोहिदास रामराजे, कोमल रामराजे, राजधर रामराजे, पप्पु रामराजे, रोहिदास रामराजे, राकेश रामराजे, प्रविण रामराजे, बंटी रामराजे, जितेंद्र रामराजे, पप्पु रामराजे या सर्वांनी लाठया काठया सळीचा वापर करून रमेश यास बेदम मारहाण केली.

या मारहाणीत रमेश रामराजे, सिताराम रामराजे, शानुबाई रामराजे व किशोर रामराजे हे चौघे गंभीर जखमी झाले आहे. त्याचबरोबर या हाणामारीत गळयातील मंगळसुत्र व 15 हजार रूपयाची रोकड देखील हरविली आहे.

याप्रकरणी प्रकाश रामराजे, भाईदास रामराजे, रोहिदास रामराजे या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर एकूण 21 जणांविरूध्द परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*