पालिका कर्मचार्‍यांचेपालिका कर्मचार्‍यांचे सामुहिक रजा आंदोलन

0
 नंदुरबार ।  प्रतिनिधी-महाराष्ट्र शासनाने पालिका कर्मचार्‍यांच्या रास्त मागण्याबाबत राज्यातील सर्व संघटना संयुक्त विद्यमाने दि.9 ऑगस्ट रोजी एक दिवसाचे सामुहिक रजा आंदोलन करणार आहेत.
शासनाने मागण्या मान्य न केल्यास नगरपालिकेमधील सर्व  कर्मचारी दि.21 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतीमधील कार्यरत सर्व मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, अनुकंपाधारक यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात संघटनेमार्फत बरेच आंदोलने केली आहेत.

शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. शासनस्तरावर मागण्या संदर्भात बैठकाही होतात परंतु पालिका कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत.

शासन न.पा. कर्मचार्‍यांच्या मागण्या संदर्भात नेहमीच दुर्लक्ष करीत आहे. शासनाने पालिका कर्मचार्‍यांच्या रास्ता मागण्याबाबत निर्णय घेणेकरीता राज्यातील सर्व संघटनाचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य न.पा. नगरपंचायत मुख्याधिकारी, व संवर्ग कर्मचारी दि.9 ऑगस्ट रोजी एक दिवसाचे सामुहिक रजा आंदोलन करणार आहेत.

तरीही शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यास नगरपालिकेमधील कर्मचारी दि.21 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन करणार आहेत अशी माहीती संघटनेचे अध्यक्ष मच्छींद्र गुलाले यांनी दिली आहे.

 

 

LEAVE A REPLY

*