वाण्याविहिर येथील जि.प.शाळेत डिजिटल वर्गाचे उद्घाटन

0
मोदलपाडा । वार्ताहर-वाण्याविहिर येथील जि.प.शाळेत डिजिटल वर्गाचे जि.प. महिला व बालकल्याण सभापती लताताई पाडवी यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले.
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथिल जि.प. मराठी शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थांना आधुनिक पद्धतीने शैक्षणिक अध्ययन अध्यापन अनुभूती मिळून मनोरंजनात्मक शिक्षण मिळण्याच्या हेतूने डिजीटल क्लासरूम तयार करण्यात आला.

यामूळे विद्यार्थांची गळती कमी होवून दैनंदिन उपस्थितीही वाढणार आहे. डिजिटल क्लासरूम तयार करण्यासाठी गृपग्रामपंचायत वाण्याविहिरने निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सरपंच अशोक पाडवी यांनी सांगितले.

या डिजीटल क्लासरूमचे उद्धाटन जि.प.महिला व बालकल्याण सभापती लताताई पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वानखेडे, सरपंच अशोक दौलतसिंग पाडवी, अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जितेंद्र पाडवी, गंगापूर गटाच्या जि.प.सदस्या पुष्पाताई सैंदाणे, वाण्याविहीर ग्रामपंचायतचे उपसरपंच संतोष जैन, नाभिक समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष कथ्थुराम सैंदाणे, अक्कलकुवा येथील शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक हरिदास गोसावी, वाण्याविहीर येथील ग्रामसेवक मनोज पाडवी, वाण्याविहिर केंद्राचे केंद्रप्रमुख पाटील, जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा माळी, श्रीहरी पाटील, हर्षदा ठाकरे, योगिता मांडवळे, ग्रामपंचायत संगणकतंज्ञ राकेश शिंदे, सुमित पाडवी, शंकर तडवी, रतन बावा आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*