तळोदा पालिकेतर्फे शौचालय बांधकामाचे 90 टक्के उद्दिष्ट पूर्ण

0
मोदलपाडा / स्वच्छ भारत योजनेंतर्गत येथील पालिकेला शौचालयाच्या एकूण उद्दीष्टापैकी 90 टक्के शौचालये बांधण्यात आल्याने शासनाने तळोदा शहर हगणदारीमुक्तीच्या मार्गावर आहे.
दरम्यान, पालिकेकडे शहरातील नागरीकांनी वैयक्तिक शौचालयांचे आणखी प्रस्ताव दाखल केले आहेत.
केंद्र शासनाने स्वच्छ भारत ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तळोदा पालिकेलादेखील 2016-17 साली साधारणतः 1 हजार 253 वैयक्तिक शौचालयांचे उद्दीष्ट देण्यात आले होते.

यासाठी नगरपालिकेस शासनाने 1 कोटी 38 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. वैयक्तिक शौचालयांसाठी नगरपालिकेने शहरातील नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली हेाती.

यासाठी शहरातील महाविद्यालय, न्यू हायस्कूल, के.डी. हायस्कूल, कन्या हायस्कूल, नेमसुशील विद्यालय अशा शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पालिका प्रशासनाने संवाद साधला.

या विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छतेची रॅली संपूर्ण गावातून काढण्यात आली होती. याशिवाय पालिकेतर्फे गुड मॉर्निंग पथक नियुक्त करुन नागरीकांचे प्रबोधन करण्यात आले होते.

स्वतः जिल्हाधिकार्‍यांनीही पालिका पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन महास्वच्छता अभियान राबविले होते. त्याचा परिपाक म्हणून नागरीकांनी प्रतिसाद देत वैयक्तिक शौचालयासाठी मोठ्या प्रमाणात पालिकेत प्रस्ताव दाखल केले होते.

पालिकेनेसुद्धा ही शौचालये नागरीकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न करुन त्यांचे बांधकाम पूर्ण करुन घेतले. तसेच पालिकेमार्फत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी 190 सीटांची सार्वजनिक शौचालये याचवर्षी बांधली आहेत.

साहजिकच शासनाने दिलेले शौचालयाचे उद्दीष्ट्य पूर्ण झाल्याने शहरदेखील हगणदारीमुक्त झाले आहे.

 

LEAVE A REPLY

*