मद्यसाठा हस्तगत

0
ब्राम्हणपुरी ता.शहादा / मध्यप्रदेशाहून महाराष्ट्रात येणारा अवैधरित्या मद्यसाठा वाहतुक करणारी मारूती व्हॅन म्हसावद पोलीसांनी सापळा रचून सुलतानपूर फाट्याजवळ सिनेस्टाईल पाठलाग करून पकडण्यात आली.
त्यात 1 लाख 98 हजार किमतीचा मुदेमालासह 1 लाख 50 हजार रूपये किंमतीची मारूती व्हॅन व दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अन्य दोन ट्रक पसार होण्यास यशस्वी झाले आहेत.

म्हसावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली होती की, खेतियाहून म्हसावद मार्गे शहाद्याकडे येणार्‍या वाहनात अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत आहे.

पोलिसांनी सापळा रचून सुलतानपूर फाट्याजवळ येणार्‍या वाहनांची चौकशी केली असता पांढर्‍या रंगाची मारूती (क्र.एम.एच. 15, एफ.4563) यात 44 बॉक्स देशी दारू डिकीत रचून ठेवण्यात आले होते.

या बॉक्सची किंमत 1 लाख 98 हजार रूपये एवढी आहे व मारूती व्हॅनची किंमत 1 लाख 50 हजार असा एकूण 3 लाख 48 हजार रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त केला असून मुख्य आरोपी मुकेश चौधरी रा.खेतिया ह.मु.शहादा व सहाआरोपी अनिल शिवाजी शिरसाठ रा.पानसेमल यांना अटक केले आहे.

याबाबत म्हसावद पोलीस ठाण्यात घनश्याम विठ्ठल सुर्यवशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपासाअंती अवैधरित्या मद्यसाठा वाहतुक करणारे दोन ट्रक पसार झाल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

*