शिवसेना शाखेतर्फे उपहासात्मक आंदोलन

0
नंदुरबार । दि.21 । प्रतिनिधी-शहरातील स्टेशन रोड, नेहरू चौक, सिंधी कॉलनी, माणिक चौक अशा गजबजलेल्या ठिकाणी मोकाट गुरांची संख्या वाढत असून त्याकडे या विषयावर नगरपरिषद लक्ष देत नसून यामुळे नागरीकांना नाहक अपघातास बळी पडावे लागते.
तसेच जनावरांनाही इजा पोहोचते व मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडीही होते. असा प्रकार टळावे म्हणून शिवसैनिक स्वतः त्या मोकाट जनावरांना रस्त्याच्या बाजूला करीत असतात. शिवसेना शाखेतर्फे शिवसेनास्टाईलने उपहासात्मक आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसैनिकांनी गाईंना फुलांचा हार घालून त्यांची पूजा केली. यावर आतातरी नगरपरिषदेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.

या उपहासात्मक आंदोलनात शाखाप्रमुख दिग्विजय पाटील, हर्षल तवर, प्रफुल्ल खैरनार, विक्की पाटील, मानस शास्त्री, भावेश ईशी, बंटी साळवे, कृष्णा भोपे, अभिषेक गावीत, अक्षय सोनार आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*