शहाद्यात ‘सिद्धार्थ महाबोधी विहार’चे भूमिपूजन

0
नंदुरबार / डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा मार्ग दाखविणार्‍या बुद्ध धम्माचा स्वीकार केला. बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसाराची जबाबदारी नव्या पिढीची असून, धम्म चळवळ गतिमान व्हावी यासाठी गावोगावी बुद्धविहारांची निर्मिती आवश्यक आहे, असे प्रतिपादन चैत्यभूमी येथील भन्ते आनंद यांनी केले.

कुकडेल-मनरद परिसरात सिद्धार्थ युवा मंच व इतर समविचारी संघटनांच्यावतीने नियोजीत ‘सिद्धार्थ महाबोधी विहार’च्या भूमिपूजनाप्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी शहादा पंचायत समितीचे माजी उपसभापती बापू जगदेव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष कुवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भामरे, भाजपा सरचिटणीस डॉ.कांतीलाल टाटिया, नगरसेवक संदीप पाटील आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*