लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार व्हा

0
नंदुरबार । प्रतिनिधी-18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांनी आपले नांव जागरूकपणे मतदार यादीत नोंदणे स्वतःची जबाबदारी असून ती प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे.
इतर हक्कांप्रमाणेच मतदानाचा हक्क बजावून देशाच्या लोकशाहीला अधिक बळकट करणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे आवाहन नोडल ऑफीसर प्रा.डॉ.माधव कदम यांनी जी.टी. पाटील महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवडणूक कार्यालयातील 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत मतदान नोंदणीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेंतर्गत ‘इंटरव्यूह स्कुल मॅनेजमेंट’ कार्यक्रम जी.टी. पाटील महाविद्यालयात घेण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस. श्रीवास्तव यांनी केले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ.आर.आर. कासार, उपप्राचार्य डॉ.एम.जे. रघुवंशी, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य ए.के. शेवाळे उपस्थित होते.

यावेळी प्रा.डॉ.कदम यांनी नवमतदारांना नमुना नं.6 भरून मतदार यादीत नांव समाविष्ट करण्याचे आवाहन केले. तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून निवडणूक आयोग कार्य, मतदान पद्धती, वोटींग मशिन, नांवनोंदणी पद्धती आदी विषयांवर चर्चा घडवून आणली.

यावेळी निवडणूक शाखेचे शिंत्रे व जाधव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.विजय चौधरी यांनी केले. अमोल राजपूत, रजनी पाटील, पृथ्वीराज राजपूत यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*