क्रीडा शिक्षकांच्या तासिक कमी करण्याच्या निर्णयाचा निषेध

0
नंदुरबार । दि.19 । प्रतिनिधी-क्रिडा शिक्षकांच्या तासिका कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा निषेध करून येत्या काळात जिल्ह्यात होणार्‍या शालेय क्रिडा स्पर्धांवर बहिष्कार घालण्याचा इशारा क्रिडा शिक्षकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हा क्रिडा अधिकारी यांना देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, 2017-18 मध्ये काढलेल्या शासकीय परिपत्रकानुसार शाळांना विषयावर तासिकांचे नियोजन देण्यात आले आहे.

यात आरोप व शारिरीक शिक्षक आणि कला या विषयांचा भार 50 टक्याने कमी कर ण्यात आला आहे. यामुळे हा विषय शिकवणारे शिक्षक अतिरीक्त ठरणार आहेत. अभ्यासक्रमात आरोग्य शिक्षणाला केवळ आठ टक्के भार दिला आहे.

शासनाच्या क्रिडा धोरणानुसार आरोग्य व शारिरीक शिक्षण या विषयाला दररोज किमान एक तासिका खेळासाठी अनिवार्य करण्याचे म्हटले होते.

पहिली ते 10 वीतील विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रकात क्रिडा विषयासाठी किमान पाच तासिका असाव्यात, अशी शिफारस यशपाल समितीने केली आहे.

शासनाच्या क्रिडा विभागाने या गोष्टींचा कोणताही अभ्यास न करताना हा निर्णय घेतला आहे. शासनाने 100 खेळांचा समावेश या शैक्षणिक वर्षाअखेर होणार्‍या शालेय स्पर्धांसाठी केला आहे.

यासाठी प्रत्येक क्रिडा शिक्षकाला आठवडयाला दोन याप्रमाणे महिन्याला 9 तासिका देण्यात आल्या आहेत. एवढया कमी तासिकेत खेळांचा सराव आणि क्रिडा विकास होणे अशक्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर क्रिडा शिक्षकांच्या सह्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*